रात्री आकाशकडे पहात असताना ब्रम्हांड डोळ्यापुढून सावकाश सरकत जातं. हिंदूचं पहिलं प्रकरण वाचताना मला नेमकं तसं वाटलं. मोहेंजो-दडो या अतिप्राचीन नगरीच्या उत्खननाच्या जागतिक प्रकल्पावर, काम करणारा खंडेराव हा होतकरू पुरातत्वज्ञ अवघ्या जगाला आव्हान देणारं आपलं संशोधन जागतिक परिषदेत मांडतो आणि मोहेंजो-दडो ते तापी खोर्यातलं मोरगाव यांचा जैविक संबंध प्रस्थापित करू पहातो. पहिल्याच प्रकरणात येणारं मोरगावही विश्वरुप दर्शनासारखं भासतं.
निरीक्षण शक्ती, किस्से, गोष्टी, भाषासांस्कृतिक जाण वा भान, ह्या साहित्योपयोगी सामग्रीचा विचार करता नेमाडे हा गडगंज कुबेर आहे, अशी प्रतिक्रीया एका मित्राने एसएमएसद्वारे दिली. मला या शब्दकळेचा परिचय नाही पण त्यातली लयकारी पद्याच्या जवळ जाणारी म्हणून विलक्षण प्रभावी वाटली. कालानुक्रमाने गोष्ट सांगण्याची मळलेली वाट नेमाडे यांनी सोडून दिल्याने, काळाचं आकुंचन-प्रसरण करण्याचं वेगळं तंत्र त्यांना शोधावं लागलं. हे तंत्रं कितपत यशस्वी ठरलंय याचा निवाडा पहिल्या प्रकरणात करणं अवघड आहे. मात्र अनेकवचनी भूतकाळी हा परवलीचा शब्द उच्चारण्यापूर्वीच हिंदू वाचकावर गारुड करते, हे खरं.
खंडेराव जे पाहतोय, वागतोय, जगतोय तेच पाहतोही आहे. या साक्षी भावाच्या सूत्राने कादंबरीची सुरुवात होते. विश्राम बेडेकरांनी आपल्या आत्मचरित्रासाठी निवेदनाचं हेच सूत्र पकडलं आहे. साक्षी भावाचं हे सूत्र आत्मचरित्राला फारसं उपयोगी नाही हे एक झाड दोन पक्षी वाचल्यावर ध्यानी येतं. खंडेरावाच्या चरित्राला ते कितपत उठाव देतं हे कादंबरीची पानं जशी वाचत जाऊ तसं कळेलच.
श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न कृषिसंस्कृती हळूहळू परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्या नागरी ऐतखाऊ औद्योगिक, व्यापारी, कोळसा-पेट्रोलादी खनिजांवर धावणार्य़ा शोषण संस्कृतीचा विजय झाला. हेच महानगरी संस्कृतीच्या र्हासाचं प्रमुख कारण आहे. आजची मुंबई, न्यूयॉर्क, लंडन इत्यादी शहरही मोहेंजो-दडो प्रमाणेच निर्ममनुष्य होतील, अशी शक्यताही खंडेराव वर्तवतो.
धर्माची तत्व कोणती का असेनात कृषीसंस्कृती वा सरंजामशाही कालखंड कधीही मूलतत्ववादी नव्हता. त्यामुळेच तर डॉ. जलील बोलताना, इस्लाममधले हीनयान आणि शिया पंथ घ्या की हिंदूचे बौद्ध आणि सुन्नी पंथ घ्या, कॅथलिक आणि शैव—सॉरी वैष्णव आणि प्रोटेस्टंट—सॉरी.... अशी अर्थपूर्ण गफलत करतात. धर्म आणि त्याची तत्वं यापेक्षा लोकजीवन हेच महत्वाचं असतं. ते जीवन जर श्रमाला अर्थातच शेतीला केंद्रीभूत मानून असेल तर धर्मभेद, जातिभेद, भाषाभेद यांचा बडेजाव चालत नाही. किंबहुना विविध धर्म, पंथ, जाती, भाषा यांनी सामावून घेणारी एक समृद्ध संस्कृती तयार होते. जगातील कोणात्याही समूहाच्या वाट्याला येणार नाही असा समृद्ध भूतकाळाचा अवकाश हिंदूंना ज्यामध्ये आताच्या पाकिस्तानातील वा अफगाणिस्तानातील मुसलमानही येतात, यांना प्राप्त झाला आहे, असं खंडेराव म्हणतो.
प्रो. सांखळीया म्हणजे पाश्चात्य दृष्टीपासून न ढळणारे पण प्रामाणिक, निष्ठावान पुरातत्वज्ञ आहेत. प्रो. मंडी इंग्लडची असली तरी मूळात स्कॉटलंडची आहे. तिला खंडेरावाच्या दृष्टीकोनाबद्दल आस्था आहे. युरोपियन श्रेष्ठत्वाच्या गंडाची छाप अनेक समाजशास्त्रीय सिद्धांतांवर आहे. त्यातून सुटका करून घेतल्याशिवाय विविध मानवसमूह, त्यांच्या जाणिवा, संस्कृती आणि म्हणून त्यांचं वर्तमान यांचा उलगडा करता येणार नाही या खंडेरावाच्या दृष्टीकोनाशी ती सहमत आहे. पाश्चात्य विरुद्ध देशी यासोबतच ब्राह्मणविरोधाचंही भक्कम सूत्रं या कादंबरीला आहे. नेमाडेंचा ब्राह्मणविरोध त्यांच्या श्रमसंस्कृतीच्या बांधिलकीतून आलेला आहे. जगण्यापेक्षा भाषेला केंद्रस्थानी आणण्याचा उपद्व्याप इंग्रजीच्या आधी संस्कृतने केलेला होता.
नेमाडेंच्या आधीच्या कादंबर्यांतील स्त्रियांचं चित्रण पुरेसं सखोल नव्हतं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे या नेमाडेंच्या सख्ख्या मित्राने अशी टीका केली होती. सलामीच्या प्रकरणातच तिरोनी आत्याचं तपशीलवार चित्रण करून पुढच्या प्रकरणांमध्ये अनेक बायकांच्या गोष्टी वाचायला मिळतील याची सूचना नेमाडे यांनी दिली आहे. पहिल्या प्रकरणातच वाचक मोरगावला पोचतो. हरखू (अफगाणिस्तानातील शरयू नदी), भावडू, खंडेरावाचे पूर्वज, आई-वडील, आत्या अशा अनेक पात्रांशी त्याचा परिचय होतो. त्यांच्या गोष्टी पुढच्या प्रकरणात वाचायला मिळणार हे सहजपणे ताडता येतं.
अनेकवचनी भूतकाळात रमायला होतंच. कारण तिथे आधुनिक तंत्रज्ञान पोचलेलं नसतं त्यामुळे समाजातील अंतर्विरोधाची तीव्रताही कमी असते. आधुनिक काळातच समाजातील अंतर्विरोध तीव्र आणि गुंतागुंतीचे होतात.
पहिलं प्रकरण वाचताना मी पंजाबात होतो. ते संपेपर्यंत चंडिगडहून विमान मुंबईच्या विमानतळावर झेपावलं. दोन दिवस अनेक कामांमध्ये अडकून पडलो. मग पुण्याला जाणं झालं. मागच्या गुरुवारी रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे भोपाळला जावं लागलं. दुसरं प्रकरण वाचायची सवड मध्य प्रदेशात मिळाली. विंध्याचलात. तिथे मी फणिश्वरनाथ रेणूंच्या दोन कादंबर्या विकत घेतल्या. मैला आँचल आणि परती परिकथा. मैला आँचल ही मेरीगंज या गावाची कहाणी आहे तर परती परिकथा, परानपुर या गावाची गाथा आहे. दोन्ही गावातली लोकसंस्कती, राजकारण, जातीचे आणि वर्गाचे अंतर्विरोध, भाषा, धर्म याचं मर्मग्राही चित्रण रेणूंनी केलं आहे. मैला आँचल ही कादंबरी १९५० च्या दशकात प्रसिद्ध झाली. ती कादंबरी हिंदी नाहीच असाच आक्षेप घेण्यात आला होता. कारण ती बिहार मधील पूर्णिया जिल्ह्याच्या भाषेतच लिहिण्यात आलीय. हिंदी, बिहारी, पूर्णिया जिल्ह्यातली लोकभाषा, नेपाळी, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा रेणूच्या साहित्यात डोकावतात. हिंदूची पुढची प्रकरणं मी रेणूच्या कादंबर्यांसोबत वाचायचं ठरवलं.
Wednesday, 4 August 2010
Tuesday, 27 July 2010
हिंदू वाचताना...पंजाबात...
चंडीगडला होतो. रमिंदरसिंगच्या चेहेर्याची ठेवण बघितली तर तो इराणी वाटतो, सुरिंदर थेट ग्रीक. रणजित म्हणाला. इखलाख इंडियन म्हणजे मुंडावंशी असावा मी मनाशी म्हटलं. अशोक नायर समोरच बसला होता. तो केरळी पण गोरा. त्याचा चेहरा नाही तरी रंग इराणहून आला की काय.
चंडीगडहून भाक्रा-नानगलला जात होतो. भारतात कुठेही प्रवास करा वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड रस्त्यारस्त्यावर दिसतात. गोहाटीला जा की चंडीगडला रस्त्यांची कामं जोरात. म्हणजे रस्त्यांच्या रुंदीकरणाची. अवाढव्य फ्लायओव्हर्सची. पुलांची. अगडबंब व्होल्वो बस सुसाट जाऊ शकेल असे रस्ते. रस्त्यांच्या कामामुळे ट्रॅफीक जाम. चिराग म्हणाला वाट लग गयी. मराठीतली वाट पंजाबापर्यंत पोचली. रात्री कोणत्या तरी हिंदी चॅनेलवर बातम्या सांगताना निवेदिका म्हणली ये तो चोर पे मोर हो गया. बातमी सुरु असाताना खाली अक्षरं—चोर पे मोर. मराठीतल्या चोरावर मोराची पाळमूळं तमिळमध्ये आहेत—चूर म्हणजे भात, मूर म्हणजे दही किंवा ताक, असं विश्वनाथ खैरे यांनी सिद्ध करून दाखवलंय. चूर-मूर, चोरावर मोर चं चोरपे मोर झालंय.
पंजाबात अनेकजण कोणत्याही हायवेला जीटी रोड म्हणतात. ग्रँट ट्रंक रोड. पाटलीपुत्र-तक्षशिला जोडणारी ही प्राचीन सडक. जीटी रोड म्हणजे अमृतसर-दिल्ली एवढा समजला जातो. दिल्लीच्या पुढेही तो जातो कोलकत्यापर्यंत. पंजाबातले धाबे फायुस्टार. तिथे जेवण काय तर चिकनचे सहा-सात प्रकार. मटणाचे तीन-चार प्रकार. सप्टेंबर ते एप्रिल मासे मिळू शकतात. ज्या महिन्यांमध्ये आर येतो तेव्हाच आम्ही मासे खातो, इखलाख म्हणाला. जुलै होता त्यामुळे मासे नाहीत. रमिंदरसोबत रेड लेबल पिताना मलईचिकन कबाब, चिकन सीग कबाब, चिली चिकन खात होतो. जेवताना व्हेज म्हटलं तर पर्याय अगदी लिमिटेड. दाल मखनी म्हणजे काळे उडीद. दाल फ्राय म्हणजे चणा डाळ. छोले नाश्त्याला असतात त्यामुळे राजमा. दम आलू म्हणजे बटाटा. आलू-मटर किंवा आलू-गोभी (फ्लॉवर). सॅलड म्हटलं की गाजर, टोमॅटो, काकडी आणि आल्या तर बीटाच्या चकत्या. वांगी, कोबी, फरसबी, लौकी, भोपळा, भेंडी, तिंडा, तोंडली, परवल अशा अनेक भाज्या धाब्यांवरून नाहीशा झाल्यात.
पंजाबात वर्षाला तीन ते चार पिकं घेतात. खरीपात बासमती किंवा धान, रब्बीत गहू. मालव्यामध्ये बासमती, धान किंवा कापूस. रब्बीत गहू. एक-दोन एकर जमीन परवडत नाही कसायला. त्याशिवाय अॅबसेंटी लँडलॉर्डची संख्या जास्त. हे लोक जमीन खंडाने कसायला देतात. वर्षाकाठी एकरी ३५ ते ४५ हजार रुपये मिळतात. दोआबात म्हणजे बियास-सतलज या नद्यांच्या मधल्या भागात, (रणजित म्हणाला पर्शियनमध्ये अब म्हणजे नदी) बटाट्याची लागवड याच जमिनीवर आहे. मालव्यात आणि मांझा (गुरुदासपूर, होशियारपूर) मध्ये हीच जमीन भाजीपाल्यासाठी वापरतात. होशियारपूरकडे सैनी लोकांची वस्ती मोठी. शतकानुशतकं ते भाज्या, फळं यांचं उत्पादन घेतात. इखलाखसिंग म्हणाला. कंभोज, सैनी हे भाजीपाला पिकवण्यात माहीर आहेत. हे म्हणजे आपल्याकडचे माळी असावेत.
सुखपालसिंग म्हणाला शेती किफायतशीर हवी म्हणजे आज माझ्याकडे १० एकर जमीन असेल तर पाच-दहा वर्षात त्यामध्ये आणखी १० एकराची भर घालता आली पाहीजे. जमीनीतून सतत उत्पन्न काढत राह्यचं. भूगर्भातून पाणी उपसत राह्यचं. धान, बासमती, बटाटा, गहू. कणभर जमीन पडीक ठेवायची नाही. खतं, कीटकनाशकं मारत राह्यचं. उत्पादन वाढवत न्यायचं. जमिनीचं काही का होईना. मालव्यातल्या काही भागात खतं आणि कीटकनाशकांनी भूजल प्रदूषित झालंय. रब्बी शेरगील हा गायक आता याच्या विरोधात जाहीरपणे बोलू लागलाय. तालुक्याच्या गावाला एक लिमोझिन असते. लग्नात भाड्याने देण्यासाठी दिवसाचं भाडं वीस हजार रुपये. आमच्याकडे लग्न साधं असतं. गुरुद्वारात होतं. कर्मकांड, मंत्रतंत्र यांचा फारसा बडेजाव नाही. रिसेप्शनला मात्र भरपूर दारू हवी. म्हणजे लायसन्स काढण्यापासून लग्नाची तयारी सुरू होते, इखलाख सांगत होता. पंजाब, हरयाना या राज्यात सर्वांना मुलंच हवी असतात. त्यामुळे गर्भलिंगचिकित्सा हा मोठा बेकायदेशीर धंदा जिल्ह्या-जिल्ह्यात फोफावलाय. मुक्तसरचा शिवचरणसिंग ब्रार मला म्हणाला होता, जमिनीची वाटणी होते म्हणून मुली नको असतात आम्हाला. त्यामुळे गावागावात वरांची संख्या मोठी आहे पण मुलीच मिळत नाहीत. सिक्कीममधून मुली आणून हरयानात त्यांची विक्री करतात. एका मुलीची किंमत ५० हजार रुपये. मागच्या आठवड्यातच दोन केसेस उघडकीला आल्या.
रोपडचं नाव रुपनगर करण्यात आलं. यावर्षी कळलं की रुपनगरचं नाव आता शहीद भगतसिंग नगर करण्यात आलंय. रोपड सतलुजच्या किनार्यावर आहे (नदी ओलांडली की दोआबा). तिथे मोहोंजोदडोच्या काळातलं एक नगर मिळालयं. म्हणजे रोपड प्राचीन शहर आहे. प्राचीन विटांचं नगर. तीनशे वर्षांपूर्वीची कुणा मुसलमानाची टोलजंग इमारत म्हणजे कबर वगैरे असावी. तिही विटांचीच. आणि आजचं रोपडही विटांचंच. सतलुजच्या किनार्यावरील मैदानी प्रदेशात एकमेव टेकाड होतं. त्या टेकाडाखालीच प्राचीन शहराचे हे अवशेष सापडले. टेकाड बहुधा सतलुजच्या गाळाचं असावं कारण एकही दगड मला तरी भेटला नाही त्यावर. रूमवर परतल्यावर हिंदू वाचायला सुरुवात केली.

Friday, 23 July 2010
हिंदू वाचण्यापूर्वी...
सिंधू आणि बिंदूः
निखिलेश चित्रेने विक्राळ वा आदी लेखकांमध्ये मराठीतल्या दोनच लेखकांची—भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर, गणना केली. आपल्या अल्पाक्षरी भाषणात बाल्झाक, प्रूस्त (फ्रेंच) आणि एदुआर्दो गॅलिनो (उरुग्वे) या लेखकांच्या रांगेत त्याने या दोन मराठी लेखकांना बसवलं आहे.
म.गांधी, विनोबा, साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहिया, यांची नावं देशी परंपरेत घेताना देशातील कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी राजकीय प्रवाहांशी नेमाडे फटकून असतात. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर परंपरेला नेमाडे आपलेसे वाटतात. मराठा, जाट या जातींची निर्मिती ब्रिटीशांनी केली अशी त्यांची मांडणी आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर ब्राह्मणांनी मुस्लिमांच्या विरोधात केला, मराठे तो ब्राह्मणांच्या विरोधात करत आहेत आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात शिवसेना उद्या शिवाजी महारांजांच्या प्रतिमेला वापरेल, हे नेमाडे यांचं विधान शिवधर्माची घटना लिहिणार्या आ.ह. साळुंखे यांना कितपत रुचेल याची शंका वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा सर्व भारतीय भाषांमध्ये पोचलेला एकमेव मराठी लेखक आहे, याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधलेलं असलं तरीही त्यांनी हिंदू असण्याचा अभिमान बाळगणार्या नेमाडे यांना आंबेडकरवादी चार हात नाही तरी दोन हात दूर ठेवणंच पसंत करतील. नेमाडेंना अडगळीचं जतन करायचं आहे. या अर्थाने ते काँन्झर्वेटिव ठरतात. उदारमतवादी हिंदू हीच त्याची भूमिका आणि ओळख आहे.
हिंदु ही कादंबरी प्रकाशित होण्याच्या दिवशीच हिंदुत्ववाद्यांनी नेमाडे यांचा पुतळा जाळला, असं प्रकाशनाच्या कार्यक्रमात समर खडस या लोकसत्तेच्या बातमीदाराचा हवाला देऊन सांगण्यात आलं. पण दुसर्या दिवशीच्या मुंबईच्या वर्तमानपत्रात मी तरी ही बातमी वाचली नाही. सनातन प्रभात या हिंदुत्ववादी संघटनेने नेमाडे यांच्या हिंदू संकल्पनेवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ब्लॉगवर ती उपलब्ध आहे. असो.
हिंदूच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना नेमाडे म्हणाले लेखक हा समाजाशी जोडला गेलेला असतो. समजाच्या मनाच्या तळात बुडी मारून तो आपलं विधान, कथानक आणि पात्रं बाहेर काढतो. लेखकाची कलाकृती अर्थात लिखाण आणि समाजाचा सांधा जुळला तरच ती कादंबरी वा लेखन लोकप्रिय होतं. अर्थातच नेमाडे यांची अशी प्रामाणिक धारणा आहे की ते मांडत असलेला देशीवाद भारतीय समाजाच्या मनात मुरलेला आहे.
कोणत्याही समाजाला, व्यक्तीला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी लेखक वा साहित्यिक आपली लेखणी झिजवतात. ही ओळख इतिहासात बुडी मारून, परंपरेचे पदर उलगडत करून घ्यायची की आत्ता प्राप्त क्षणाच्या सर्वांगीण ज्ञानाने करून घ्यायची? नेमाडे अर्थातच इतिहास, परंपरेचा वेध घेणारे आहेत. समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादीही नेमकं हेच करू पाहतात. कोणत्याही राजकीय विचारप्रवाहांप्रमाणेच नेमाडेंचा देशीवादही शत्रूलक्ष्यी मांडणीच्या जवळ जाणारा आहे.
प्राप्त क्षणाचं सर्वांगीण ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न श्याम मनोहर करतात. श्याम मनोहरांचा प्रयत्नही अस्सल देशी परंपरेतलाच आहे. वेदांचं उलट-सुलट पाठांतर करण्यात ब्राह्मणांनी आपली अक्कल वाया घालवली, मेलेली जनावरं फाडण्याचं काम ज्या जातींनी केलं त्यांनी प्राण्यांच्या शरीरशास्त्राची पायाभरणी केली नाही. म्हणजे ब्राह्मण आणि महार, ढोर यांच्यापैकी कुणीही बुद्धि वापरलेली नाही, याकडे श्याम मनोहर लक्ष वेधतात. समाजातील बुद्धिच्या स्थानाची चर्चा करताना, श्याम मनोहर व्यक्तीवर कॅमेरा फोकस करतात.
समुद्राच्या पाण्याचे गुणधर्म त्या पाण्याच्या एका थेंबात असतात. नेमाडेंना सिंधूचं आकर्षण आहे, तर श्याम मनोहरांनी थेंबावर लक्ष केंद्रीत केलं आहे. नेमाडे आणि श्याम मनोहर, हे दोन लेखक मराठी साहित्याचे दोन ध्रुव असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी फारा वर्षांपूर्वीच नमूद केलं आहे.

Wednesday, 14 July 2010
कॉर्पोरेट शैली
सुबोध, नविना आणि मी, पुण्याहून एकत्र आलो. फुटबॉल वर्ल्डकप, विशेषतः स्पेनचा संघ यावर बोलत होतो. मग अर्थातच इंग्लड, जर्मनी, ब्राझील हेही आलेच संभाषणात. मी आणि सुबोधच बोलत होतो. नविना गप्प होती. दोन पुरुष भेटले की स्पोर्टस् हा विषय येणारच असं म्हणून रविनाला या विषयात रस नाही, असं सुबोधने मला सुचवलं.
सुबोध अदबीने प्रश्न विचारतो. संभाषण चालू ठेवण्यासाठी हलकासा विनोद करतो, स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी नाही पण संभाषण इंटरेस्टिंग करण्यासाठी त्याच्या विदेश वास्तव्यातला एखादा किस्सा सांगतो किंवा नुस्तीच एखादी आठवण, उदाहरणार्थ पुण्याच्या कोपा कबाना या रेस्त्रांमध्ये आम्ही ब्राझील-नेदरलँड मॅच पाह्यली हे मी सांगितलं तेव्हा तो म्हणाला रिओ मध्ये कोपा कबाना हे रेस्त्रां आहे. त्याचा गेट-अप कमालीचा गॉडी आहे. तसं रेस्त्रां मी तरी अजून जगाच्या कोणत्याही भागात पाह्यलेलं नाही.
न्यूज पेपर्स अधिकाधिक सनसनाटी होत आहेत असं अतिशय सामान्य मत तो व्यक्त करतो कारण त्याचा उद्देश संभाषण सुरु ठेवणं हा असतो. सामान्य विषयावर सामान्य मतं द्यायची, वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्यायची, माहिती देणं, माहिती कोटं करणं, माहिती घेणं यासाठी संभाषण चालू ठेवायचं. स्वतःबद्दल अतिशय माफक बोलायचं. सोबतच्या प्रत्येक माणसाला संभाषणात सामील करून घ्यायचा प्रयत्न करायचा. त्याची काळजी घ्यायची. आपल्या कामाशी संबंध नसलेल्या विषयांवर मतं मांडणं, चर्चा करणं, गप्पा मारणं हा त्याच्यालेखी टाइमपास असावा. गुंतवणूक फक्त कामाच्या विषयात आणि कामापुरती, ही त्याची शैली आहे.
आपल्या संवेदनशीलतेचा बेगडीपणा कॉर्पोरेट शैलीच्या गावीच नसतो. म्हणून ती दुसर्याच्या संवेदनशीलतेलाही आव्हान देत नाही. त्यामुळेच मांडणी, चर्चा, गप्पा टाळून संभाषण चालू ठेवण्याचे, माहितीप्रधान ठेवण्याचे या मंडळींचे प्रयत्न असतात. हे लोक संपत्तीवान असतात. ते इकॉनॉमिस्ट वाचतात, लंडनचा टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचतात. कोस्टा, कॅफे कॉफी डे मध्ये कॉफी पितात, सिनेमा, क्रिकेट, फुटबॉल आणि देशोदेशातील खाण्याचे पदार्थ भारतात वा मुंबईत कुठे मिळतात या विषयावर बोलतात. हॉलीवूड आणि बॉलीवूडचे उत्तमोत्तम चित्रपट पाहतात. संगीताच्या मैफिलींना जातात. पाश्चात्य संगीताच्या कॉन्सर्टना जातात. त्यांच्याकडे उत्तम चित्रं भिंतीवर लावलेली असतात.
ही जगण्याची कॉर्पोरेट शैली. इतर कोणाच्या कशाला स्वतःच्याही हातात सापडणार नाही याची काळजी घेणारी. हे गडी अंगाला तेल लावून उभ्या राह्यलेल्या पैलवानासारखे असतात.

Friday, 9 July 2010
स्पॅनिश आरमाडाने जर्मन रणगाडा थोपवला......
खरगोश और कछुए की दौड जब तय हुयी,
उसी समय नही उससेही पहले खरगोश की पराजय सुनिश्चित हुयी थी,
कोई फर्क नही पडता था वो दौड़ता या सोता,
विजयी हर हालत में कछुआही होता....
जर्मनी हा ससा होता तर स्पेन कासव.
वेग, कमालीचा दम आणि ताकद ही जर्मनीची बलस्थानं होती. संघामध्ये तरुणांची म्हणजे अननुभवी खेळाडूंची संख्या जास्त होती. अर्थातच अधीरता हा त्यांचा गुण होता. आजपर्यंत झालेल्या एकूण सहा सामन्यांमध्ये स्पेनने गोलपोस्टवर मारलेल्या एकूण शॉट्सची संख्या सर्वाधिक म्हणजे १०३ आहे. पण या संघाने केलेल्या गोलची संख्या केवळ ७ आहे. या उलट सहा सामन्यांमध्ये जर्मनीने गोलपोस्टवर मारलेल्या शॉट्सची संख्या ८४ आहे आणि त्यांनी एकूण १३ गोल केले. अर्जेंटिना, इंग्लड यासारख्या मातब्बर संघाना संघांना जर्मनीने चार-चार गोल चढवून धूळ चारली होती. म्हणून जर्मनीचं कौतुक अधिक होतं.
छोटे पण अचूक पासेस, कमालीचा धीर-पेशन्स आणि बहारदार टीम वर्क ही स्पेनची खासियत होती. स्पेनचे खेळाडू पायाने चेंडू खेळवत प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडर्सना चकवत पुढे जात नव्हते (ड्रिबलिंग). आपल्या पायातला चेंडू तात्काळ आपल्या साथीकडे पास करायचा, असा त्यांचा खेळ होता. प्रतिस्पर्धी संघाच्या पेनल्टी क्षेत्रात जाऊन बॉलचा ताबा सुटणार असेल तर स्पेनचे खेळाडू आपल्या क्षेत्रापर्यंत चेंडू मागे न्यायचे आणि पुन्हा पुढे घुसायचे. मिडफील्डमधल्या गर्दीत अचूक पासेस देणं हे स्पेनचं कौशल्य होतं. चेंडूवर सर्वाधिक काळ नियंत्रण ठेवायचं, ९० मिनिटांमध्ये एखादा गोल होईलच आणि चेंडूवर नियंत्रण असेल तर प्रतिस्पर्ध्याला गोल करण्याची संधी मिळणार नाही. अशी स्पेनची व्यूहरचना होती. स्पेनचा सामना पोर्तुगाल वगळता कोणत्याही बलाढ्य संघाशी झाला नव्हता. दोन पेक्षा अधिक गोल स्पेनने प्रतिस्पर्धी संघावर कधीही चढवले नव्हते.
जर्मनीच्या खेळाडूंच्या पायात बॉल येतच नव्हता त्यामुळे चढाई करण्याची संधीच त्यांना मिळत नव्हती. स्पेनने चेंडूवर नियंत्रण ठेवून कॉर्नर कीकला गोल मारण्याची संधी साधली. स्वित्झर्लंडबरोबरच्या सामन्यात स्पेनचा संघ केवळ छोटे पासेस देत होता. जर्मनीबरोबर खेळताना स्पेनने क्रॉसेस आणि लाँग पासेस देऊन आक्रमणाचा दबाव जर्मनीवर सतत ठेवला. स्वित्झर्लंडबरोबरच्या खेळातल्या चुका स्पेनने दुरुस्त केल्या. जर्मनीच्या संघाचा कमकुवतापणा फक्त अधीरतेत होता. तो स्पेनने नेमका हेरला आणि आपल्या बलस्थानांची उजळणी केली. त्यामुळेच स्पॅनिश आरमाडाने जर्मन रणगाड्याला थोपवण्यात बाजी मारली.
वर्ल्डकप फायनलमध्ये स्पेनची गाठ नेदरलँडशी आहे. पॉल या ऑक्टोपसने स्पेनच्या विजयाचं भाकीत केलं आहे. पण वर्ल्डकपमध्ये जो जिता वही सिकंदर असतो. त्यानंतर उरतं ते सामन्यानंतरचं कवित्व.......

Tuesday, 6 July 2010
पुरुषप्रधान पत्रकारिता
जॉर्ज फर्नांडीस यांच्या विश्वासू सहकारी जया जेटली यांच्याबद्दल ३० जून रोजी ‘मेरा वो सामान लौटा दो’ या मथळ्याचा मजकूर लोकसत्तेत प्रकाशित झाला आहे.
• याच बंगल्यात जया जेटलींनी तहलकाकांडातील सौदेबाजी केल्याने जॉर्जना संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
• पण प्रदीर्घ दुराव्यानंतर आजारी जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनात पत्नी लैला फर्नांडिस यांचे पुनरागमन झाल्यापासून त्यांच्याशी जया जेटलींचा संघर्ष पेटला असून त्यांना या बंगल्यात प्रवेशाला ‘मनाई’ करण्यात आली आहे.
• लैला दूर असतानाच्या काळात देशविदेशातून हौशेने आणलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू, पुस्तके आणि फर्निचरनी जया जेटलींनी जॉर्ज यांचा बंगला सजविला होता. निदान तसा दावा त्या आज करीत होत्या.
• माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या सरकारी बंगल्यातील फर्निचर, पुस्तके आणि अनेक ‘दुर्मिळ’ वस्तू ताब्यात घेण्यासाठी फर्नांडिस यांच्या एकेकाळच्या सहकारी समता पार्टीच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांनी बंगल्यासमोर चांगलाच गोंधळ घातला.
• एका जमान्यात या बंगल्यात त्यांचा शब्द म्हणजे ब्रम्हवाक्य होते. तो मोडण्याची भल्याभल्यांची हिंमत होत नसे. पण आज बंगल्यात ठेवलेले सामान आपल्याला परत न्यायचे आहे, असे वारंवार सांगूनही त्यांचे कुणी ऐकत नव्हते. हा बंगला तूर्तास लैला फर्नांडिस यांच्या ताब्यात आहे. ७ जुलै रोजी ८० वर्षीय जॉर्ज राज्यसभेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. अल्झायमरने ग्रासलेले जॉर्ज सध्या लैला फर्नांडिस यांच्या ताब्यात आहेत.
सदर मजकूरातील ही उद्धरणे पाह्यल्यावर जया जेटली या महिलेला जॉर्ज फर्नांडीस यांच्या व्यतिरिक्त अन्य ओळख नाही अशी वाचकाची समजूत होईल. लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत जया जेटली यांचा उल्लेख जॉर्ज फर्नांडीस यांची मैत्रीण असा करण्यात आला होता. देशविदेशातून आणलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू, पुस्तके, फर्निचर, एका जमान्यात या बंगल्यात त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होते, इत्यादींची सांगड वाचकाने जया जेटली यांनी केलेल्या सौदेबाजीशी करावी अशी हेतूपूर्वक मांडणी बातमीदाराने केली आहे.
वस्तुतः जया जेटली यांनी जॉर्ज फर्नांडीस संरक्षणमंत्री असताना कोणतीही सौदेबाजी त्यांच्या सरकारी निवासस्थानी केलेली नव्हती. त्यामुळे जॉर्ज फर्नांडीस यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तहलकाच्या टेप्स आजही उपलब्ध होऊ शकतात त्या पाहून या आरोपातील सत्त्यासत्यतेची पडताळणी करता येते. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना वृत्तपत्र वा वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांच्या आधारे सौदेबाजीचा आरोप करणं जबाबदार पत्रकारितेचं लक्षण नाही. त्यातही आरोप करताना जॉर्ज फर्नांडीस यांना क्लीन चीट देऊन त्यांच्या पत्नीची भूमिका निभावणार्या स्त्रीवर सौदेबाजीचा आरोप करणं हे तर पुरुषप्रधान पूर्वग्रहाचं लक्षण आहे.
देशातील पारंपारिक हस्तकलांचं जतन आणि संवर्धन करण्यात जया जेटली यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील हस्तकलांचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलं. प्रत्येक राज्यातील हस्तकलांचा नकाशा त्यांनी बनवला आहे. या कामाला हिंदुस्थान मोटर्स, टाटा समूह अशा अनेकांनी अर्थसहाय्य केलं. हे नकाशे हस्तवस्तू संग्रहालयात अॅक्रिलीकच्या फ्रेममध्ये कायमस्वरूपी प्रदर्शित करण्याची योजना यावर्षीच्या जानेवारी महिन्यात पूर्ण होणार होती. निव्वळ अॅक्रिलीकच्या फ्रेम्ससाठी १० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी जवळपास १० वर्षं जया जेटली आणि त्यांचे सहकारी खपत होते. पारंपारिक कलावस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून दिल्ली हाट हा कायमस्वरूपी प्रदर्शनाचा कॉम्प्लेक्स दक्षिण दिल्लीमध्ये उभारण्यात जया जेटली आणि त्यांच्या सहकार्यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील खान मार्केट परिसरात दस्तकारी या पारंपारिक कलाप्रकारालाही कायमस्वरूपी घर मिळावं यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. पारंपारिक कलावस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्याला वाहून घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीचं आपल्या वैयक्तीक संग्रहाशी असलेलं नातं कमालीचं उत्कट आणि भावनिक असणार. मात्र हे समजण्याइतकी संवेदनशीलता बातमीदाराकडे नसल्याने बातमी लिहिताना त्याने सनसनाटी शैलीचा आधार घेतला.
मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी सौदेबाजी करणारी, त्या बंगल्यावर हुकूमत गाजवणारी, बंगल्यातील दुर्मिळ वस्तू, पुस्तकं, फर्निचर आपलं आहे असा दावा करणारी, मंत्र्याची बिनलग्नाची बायको अशी जया जेटली यांची विपरीत प्रतिमा त्यामुळे वाचकाच्या मनात तयार होते.

Tuesday, 29 June 2010
राजनेती
गंगाजल. अपहरण. राजनेती. प्रकाश झा च्या चित्रपटांना बिहारची पार्श्वभूमी असते. बिहारातील राजकीय-सामाजिक समस्येच्या भोवती हे चित्रपट गुंफलेले असतात. बिहारमधील राजकारणच सर्वत्र विशेषतः देशातल्या प्रत्येक राज्यात आहे असं त्यातून सुचवलेलं असतं.
हिंदी चित्रपटांचं नातं काळाशी वा परिसराशी नसतंच. नाईलाजने अनेक चित्रपटांचा परिसर मुंबई हाच राह्यला आहे. अधून-मधून दिल्ली. काश्मीर, हिमाचल प्रदेश अनेक चित्रटांमध्ये डोकावतात. या उलट प्रकाश झा चे चित्रपट बिहारशी म्हणजेच काळाशी आणि परिसराशी नातं जोडू पाहतात. वस्तुतः त्यांचं चित्रीकरण बिहारात झालेलं नाही, चित्रपटाच्या शीर्षकात वा कथेत बिहारला स्थान नाही. परंतु अनेक स्थानांची नावं, पात्रांची भाषा यामधून बिहारी मसाला पेरलेला असतो.
रमणीय समुद्रकिनारा, हिमशिखरे, नेत्रसुखद निसर्ग वा परिसर, अत्याधुनिक उद्यानं. त्यामध्ये गाणी म्हणत नाचणारे नायक-नायिका त्याच्या चित्रपटांत अपवादानेच असतात.
हिंसा, भ्रष्टाचार यांचे डाग नायकाच्या हातावरही असतात पण तरीही प्रेक्षकांची सहानुभूती त्यालाच असते. चित्रपटाचा नायकही सामाजिक-राजकीय परिस्थितीचा बळी असतो. ही वस्तुस्थिती प्रेक्षक स्वीकारतात.
प्रकाश झा च्या चित्रपटांची पटकथा आटोपशीर असते. संवाद नेमके असतात. चित्रपटाला वेग असतो. घटनांनी गच्च भरलेला असतो. या प्रकृतीच्या चित्रपटांना गाणी मानवणारी नसतात. त्यामुळे नाईलाजाने एखादं गाणं डोकावतं पण गाण्यांसाठी त्याचे चित्रपट प्रसिद्ध नाहीत.
सामाजिक वा राजकीय समस्येचं चित्रण, उकल वा त्यावरील भाष्य, त्यावर केलेलं राजकीय वा सामाजिक विधान यासाठी प्रकाश झा प्रसिद्ध नाही. त्याचे चित्रपट करमणूक प्रधानच असतात. हिंसा हा त्या चित्रपटांच्या करमणूकीचा गाभा असतो. हिंसाचार आपल्या आजूबाजूला असतोच. त्यासाठी बिहारात वा अन्यत्र जाण्याची गरज नसते. हिंसाचार आपल्याला दिसतो, आपल्या अनुभवातही असतो. पण तरिही त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणजे हिंसा का व कशी उफाळून येते हे आपलं आपल्याला कळत नाही. प्रकाश झा वा बाजारू चित्रपट या विषयावर कॅमेरा फोकस करत नाहीत. त्यांचा भर हिंसेच्या नानाविध तर्हा मांडून लोकांचं मनोरंजन करणं यावर असतो. हिंसेच्या या नानाविध तर्हा बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक हॉलीवूडमधून आयात करतात. राजनेतीतले अनेक शॉट्स गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटातले आहेत, उदाहरणार्थ मोटारीत ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात नायकाच्या प्रेयसीचा अंत होणं. अर्थातच प्रकाश झा ला स्वतःची चित्रभाषा गवसलेली नाही. त्याचे चित्रपट वास्तवाशी नातं सांगण्याचा आव आणतात पण ते वास्तववादी नसतात. (वास्तववाद म्हणजे वास्तवाचं यथातथ्य चित्रण नसतं तर वास्तवाचं आपलं आकलन अधिक समृद्ध करणं असतं.)

Monday, 21 June 2010
फादर्स डे
आईच्या किर्तीवर जगतो तो अधम, बापाच्या ख्यातीवर मिरवतो तो त्याच्यापेक्षा मोठा अधम तर सासर्याच्या मोठेपणावर रूबाब करणारा तो अधम शिरोमणी. हा अर्थ सांगणारं एक संस्कृत सुभाषित वडलांनी लहानपणी शिकवलं होतं. श्यामची आई या कादंबरीत पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींनीही पिता-पुत्रांमधल्या सनातन संघर्षाची दखल घेतली. कोसला या कादंबरीतील पांडुरंगाने बापाच्या विरोधात बंडांचं निशाणच हाती घेतलं. मुगले आझम या चित्रपटातील परिकथेला वास्तवाचा भक्कम आधार याच सनातन संघर्षाचाच आहे. बहुतेक हिंदी चित्रपटातले नायक बापाच्या विरोधात बंड पुकारूनच आपली हिरोगिरी सिद्ध करायचे. अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन या प्रतिमेपर्यंत हाच सिलसिला जारी होता.
एकविसाव्या शतकात हा सनातन संघर्ष निकाली निघाला का काय, अशी शंका येते. मार्केट इकॉनॉमीने वा बाजारपेठेने फादर्स डे आणला आणि समस्त पुत्रांनी आपआपल्या बापांचे गोडवे गायला सुरुवात केली. २० जून वा त्याच्या आगेमागे वर्तमानपत्रात आलेले सेलिब्रिटीजच्या मुलांचे वा सेलिब्रिटी मुलांनी आपल्या बापाबद्दल लिहिलेले लेख पाह्यले तर दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगेमधल्या पितापुत्रांच्या संबंधांची आठवण होईल. आई, बाप आणि सासरा तिघांच्याही किर्तीवर वा मोठेपणावर जगणारे, रुबाब करणारे, अभिमानाने आई-बापांचा वारसा मिरवणारे बक्कळ लोक सध्या सर्व क्षेत्रात सापडतील. विसावं शतक जर बंडखोरांचं असेल तर एकविसावं शतक अधमांचं वा अधमाधमांचं आहे असंच म्हणावं लागेल. अशा प्रकारचं सपक आणि सरबरीत भाष्य करायचा मोह अनेकांना आवरता येणार नाही. मुद्दा आहे समाजात होणारे बदल टिपण्याचा आणि हे बदल घडवून आणणर्या शक्ती कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा.
पिता-पुत्रांमधल्या सनातन संघर्षाची मूळं कुटुंबाच्या आणि समाजाच्या आर्थिक-सामाजिक रचनेत असतात. एकत्र कुटुंब पद्धती वारसा हक्कावर आधारलेली होती. संपत्तीवरचं, मालमत्तेवरचं नियंत्रण अर्थात कुटुंबातल्या सत्तेचं नियंत्रण मुलाकडे जाणं निश्चित होतं. सत्तेचं हे हस्तांतरण शक्य तितक्या लवकर व्हावं याकडे आईचा ओढा असतो कारण सर्वाधिक सत्ता तिच्यावर गाजवली जात होती. त्यामुळे आई नेहमीच मुलाला फितूर असायची. सत्तांतर लांबणीवर टाकण्यामध्ये बापाचे हितसंबंध असतात. त्यासाठी तो अनेक चाली खेळत असे. संपत्ती आणि सत्ता जेवढी मोठी त्याप्रमाणात या संघर्षाची रंगत वाढते. बहुसंख्य लोकांची संपत्ती आणि सत्ता अतिशय छोटी असते. त्यामुळे कुटुंबातील संघर्षाला व्यापक परिमाण मिळत नसलं तरीही त्याची तीव्रता कमी नव्हती. पिता-पुत्रांच्या संघर्षात होणारी आईची घुसमट अनेक कलाकृतींमध्ये प्रकट होते. बाजारू हिंदी चित्रपटांना काळ्या-पांढर्या रंगातच क्षोभनाट्य रंगवायचं असल्याने त्यांनी अनेकदा आई या पात्राला फाटा देऊन मेलोड्रामा गडद केलेला असतो, उदा. शराबी हा अमिताभचा चित्रपट.
मार्केट इकॉनॉमी वा बाजारपेठ केंद्रीत अर्थव्यवस्थेत वारसा हक्क गुंतागुंतीचे असतात कारण संपत्तीच्या निर्मितीला अधिक महत्व असतं. जेवढे अधिक पाईप जोडाल तेवढा पैसा वाढत जाते. बहुतेक बाबी आऊटसोर्स केल्याने कोण कोणाचं शोषण करतोय हे कळेनासंच होतं. म्हणजे नाईके या बुटांचा कारखाना नसतोच. नाईके म्हणजे बुटाची स्पेसिफिकेशन्स अर्थात डिझाईन असतं. त्या डिझाईनबरहुकूम बुटांचं उत्पादन जगातल्या अनेक कारखान्यांमधून होतं. नाईके फक्त उत्पादनाच्या दर्जाच्या खबरदारी आणि जबाबदारी घेते. ती मार्केटिंग कंपनीच असते. कारखाने तिच्या मालकीचे नसतातच. कामगारांनी संप केला तरी उत्पादनात खंड पडत नाही. मुंबईच्या कापडगिरण्या बंद पडण्याचं महत्वाचं कारण आऊटसोर्सिंग हेच होतं. असो. मुद्दा हा की मार्केट इकॉनॉमीत कारखानेच नाही तर कुटुंबाचेही तुकडे पडतात. त्यामुळे बापाच्या विरोधात मुलांनी बंड करण्याच्या शक्यताच उरत नाहीत. किंबहुना बापाच्या संपत्तीवर, भांडवलावर वेगळा धंदा उभारून बापाचं आणि स्वतःचंही स्वातंत्र्य अबाधित ठेवता येतं. फादर्स डे साजरा करणार्यांच्या अॅस्पिरेशन्स वा आकांक्षा याच असतात. कोणाकडे किती संपत्ती आहे हा मुद्दा गौण असतो.

Thursday, 17 June 2010
फुटबॉलच्या मैदानावर लाल-पांढरे
अ, ब आणि क त्रिकोणात उभे असायचे. अ च्या एका दिशेला ब तर दुसर्या दिशेला क. प्रतिस्पर्धी अंगावर चालून आले की अ, ब किंवा क कोणाकडेही बॉल पास करायचा. बॉल कोणत्या दिशेला न्यायचा हे सर्वांनी मिळून ठरवलेलं असायचंच. अ, ब, क च्या जागा घ्यायला ड, इ, ई, फ असे इतर असायचेच. बॉल कुठेही गेला की त्रिकोणात छोटे पास देत आगेकूच करायचे. हे लाल टी शर्टवाले.
या उलट पांढरे टी शर्टवाले. त्यांच्या रांगा होत्या. पहिली रांग, तिच्यापाठून दुसरी रांग. त्यांचा भर शक्तीवर. म्हणजे त्यांचा गोली जोरदार किक मारायचा ती एकदम लाल टी शर्टवाल्यांच्या गोलपोस्टच्या जवळ जायची. पांढरे टी शर्टवाले पळत जाऊन बॉलचा ताबा घ्यायचे. लांब लांब पासेस द्यायचे ही पांढर्या शर्टवाल्यांची व्यूहरचना.
लाल शर्टवाल्यांच्या पायातून बॉल काढून घेणं पांढर्यांना जमतच नव्हतं. लालवाल्यांचा खेळ दृष्ट लागण्यासारखा, डोळ्याचं पारणं फेडणारा होता. पांढर्यांच्या गर्दीतून गोलपोस्टकडे ते बॉल टोलवत न्यायचे. तिथे बॉल गेला की सुरु होतो कौशल्याचा आणि नशिबाचा खेळ. कारण तोवर सर्व पांढरे बॉलला रोखायला सरसावलेले असायचे. रणकंदनच व्हायचं आणि पांढरे बॉल परतवण्यात यशस्वी व्हायचे.
लाल टी शर्टवाले चणीने लहान होते. उंचीनेही लहान होते. छोटे पास देत आगेकूच केल्याने त्यांची दमछाक कमी व्हायची. बॉलवर नियंत्रण त्यांचंच असायचं. या उलट पांढरे. ते मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पळायचे. त्यातही गोल हाणणारे अधिक वेगाने धावायचे. लालवाल्यांची बचावाची फळी मात्र निवांत असायची. बॉलवर त्यांचंच नियंत्रण असल्याने बचावाला असणारे दोघे पांढर्यांची टोळी वा त्यांच्यातले चार-दोन सरसावले तरी फाफलून जायचे.
पांढरे धिप्पाड होते. कॉर्नर कीक मिळाली की बॉल डोक्याने टोलवायचे. या उलट लाल. कॉर्नर कीक मिळाल्यावरही त्रिकोणात बॉल घुमवत सरपटी खेळ खेळायचे. त्यामुळे पांढर्यांना बचावासाठी भरपूर वेळ मिळायचा. एवढ्या पायांतून बॉल गोलमध्ये ढकलण्याची संधी कमी मिळायची. मिळाली तरी पांढर्यांचा गोली भारी होता. तो बरोब्बर बॉल अडवायचा.
अखेरीला संधी मिळाल्यावर पांढर्यांनी बॉल लाल्यांच्या गोलपोस्टकडे टोलवला. लाँग पास. तिथे दोन पांढरे पळत पोचले. लाल्यांचा एक गोली. आणि दोन डिफेंडर. ही बचाव फळी अचानक हल्ल्याने फाफलली. लाल्यांच्या गोलीने जमिनीवर लोळण घेतल्यावर पांढर्यांच्या गणवेशातला काळा वेगाने पुढे सरकला. त्याने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. सामन्यावर नियंत्रण लाल्यांचं पण गोल पांढर्यांचा झाला.
लाल्यांनी पांढर्यांकडून काहीतरी शिकून दोन शैलींचा संगम करायला हवा होता. कौशल्याला, कलेला शक्तीची जोड द्यायला हवी होती.
(स्पेन आणि स्विर्त्झलंड यांच्या सामन्यात स्विर्त्झलंडचा विजय झाला. स्पेन युरोपियन चँपियन पण विश्वकप स्पर्धेत त्यांना पहिल्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अर्थात ते अजून स्पर्धेत आहेतच. छोटे पासेस ही दक्षिण अमेरिकन विशेषतः ब्राझीलची शैली. लाँग पासेस ही युरोपियन शैली.)

Tuesday, 15 June 2010
भोपाळ वायुकांडः ठेंगण्या लोकांचा ध्यास
उलटा चोर कोतवाल को डाँटे, अशी म्हण हिंदी भाषेत आहे. भोपाळ वायुकांडाबाबत अपराधी कोण आणि न्यायाधीश कोण हेच कळेनासं झालंय. केंद्रीय कायदामंत्र्यांनी न्यायालयावर ठपका ठेवलाय तर पंतप्रधानांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समितीला अहवाल द्यायला सांगितलाय. भोपाळ वायुकांडाला जबाबदार असलेल्यांना दोषी ठरवून न्यायालयाने तात्काळ जामीन दिलाय.
विधिमंडळ, न्यायालय, सरकार म्हणजे अर्थातच मंत्रिमंडळ, नोकरशाही, पोलीस आणि तपासयंत्रणा या सर्वांना पैसे चारून वॉरन अँडरसन आणि युनियन कार्बाईड यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली नाही. देशातील माणसांची प्रतिष्ठा आणि जगण्याचा हक्क यांची सांगड भांडवली विकास, परदेशी गुंतवणूक, औद्योगिकरण यांच्याशी घातल्यामुळे विकासाची किंमत कोणीतरी द्यायला हवीच, यावर देशातील राज्यकर्त्या वर्गाचं एकमत आहे. राज्यकर्ता वर्ग म्हणजे अर्थातच विविध समाजघटकांचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, नोकरशहा आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणारे आणि त्यांच्या समकक्ष असणारे खाजगी क्षेत्रातील कामगार, नोकर, अधिकारी वर्ग.
गरीबीची लाज बाळगू नका. गरीब असलो तरीही आपल्याला ताठ मानेने जगण्याचा हक्क आहे. किंबहुना श्रीमंतांनी, धनदांडग्यांनी गरीबांची सेवा करणं हा आपला धर्म मानला पाहीजे अशी म. गांधींची शिकवण होती. याच आधारावर त्यांनी बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला. पाश्चात्य विकसीत राष्ट्रांचं विकासाचं प्रारुप आपल्या देशाला उपयोगाचं नाहीच पण जगासाठीही इष्ट नाही अशी गांधीजींची भूमिका होती. संपत्तीची निर्मिती करणं याला कोणतंही सरकार प्राधान्य देतं. तेच नेहरू वा त्यांच्यानंतरच्या सरकारांनी केलं. लहान मुलं आणि बुटका माणूस यांची उंची सारखी असली तरी आपण त्यात फरक करतो. कारण लहान मुल मोठं होणार असतं. त्याची उंची वाढणार असते. बुटकी माणसं मोठीच असतात. त्यांची उंची वाढणार नसते. भांडवलशाहीने जगातील बहुसंख्य देशांना ठेंगणं बनवलं आहे. विकसीत पाश्चात्य राष्ट्रांचा कित्ता आपण गिरवला तर आपणही उंच होऊ असं या ठेंगण्या लोकांना वा देशांना म्हणजे या देशांमधील राज्यकर्त्या वर्गाला वाटत असतं. पाश्चात्य देशांनी वसाहतींमधील लोकांच्या शोषणातून संपत्ती निर्माण केली. आपल्याला संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणत्या तरी जनसमूहांचं शोषण करावं लागणार, विकासाची ही किंमत गरीबांनी म्हणजे मुंबईतले कापडगिरणी कामगार, जंगल वा अविकसीत प्रदेशातील आदिवासी यांनी द्यावी, अशी या राज्यकर्त्या वर्गाची धारणा आणि भूमिका असते.
भोपाळचं औद्योगीकरण करायचं तर युनियन कार्बाईडचा कारखाना आला पाहीजे, त्याचं डीझाईन सुरक्षा विषयक मुद्दे डोळ्याआड करा, वायुगळती झाली तरीही अमेरिका वा अमेरिकन कंपन्या दुखावतील असा निर्णय घेऊ नका. आपण आज गरीब आहोत, शक्तीहीन आहोत, जेव्हा शक्ती कमावू वा तिसरी शक्ती बनू तेव्हा अमेरिका वा प्रगत देशांना धडा शिकवू किंवा तेव्हाच त्यांच्यासमोर ताठ मानेने उभे राहू शकू, ही राज्यकर्त्या वर्गाची धारणा होती. त्यामुळे वायुगळतीमुळे मेलेल्यांना वा कायमचे अपंग झालेल्यांना नुकसान भरपाई देताना युनियन कार्बाईड वा अमेरिका यांच्या दबावापुढे मान तुकवण्याच्या निर्णयावर वस्तुतः सहमती असते. तशी सहमती होती म्हणूनच सरकार आणि न्यायालय दोघांनीही गुन्हेगांरांचे जोडे उचलण्यात धन्यता मानली.
एन्रॉन प्रकरणी शरद पवार, नरसिंहराव आणि वाजपेयी सरकारांनी हेच केलं. सरदार सरोवर प्रकल्पाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने केलेले सर्व दावे खरे ठरले तरीही सरकार, न्यायालय यांच्या भूमिका बदलल्या नाहीत. ठेंगण्याच्या देशातील राज्यकर्त्या वर्गाला औद्योगिक, विकसीत देशांतील माणसांएवढं उंच व्हायची आकांक्षा आणि ध्यास असेल तर गरीबांच्या घरावर, जगण्यावर वा जगण्याच्या हक्कावर वरवंटा फिरवला जाणारच.

Wednesday, 2 June 2010
निमित्त चेराबंडा राजूच्या कवितेचं......
चर्चा म्हणा वा गप्पा, देशातल्या लोकशाही व्यवस्थेसंबंधात चालल्या होत्या. चेराबंडा राजू या तेलगू कवीच्या कवितेच्या काही ओळी म्हणून शेखरने हेमूच्या युक्तिवादात खोडा घातला., हे झाड सुंदर आहे, तरी मी ते तोडणारे कारण मला घर बांधायचंय. आपल्या देशातली लोकशाही सुंदर झाडासारखीच आहे, शेखर म्हणाला.
आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था जनसामान्यांना न्याय देणारी नाही. या व्यवस्थेवर देशी आणि परदेशी भांडवलदारांनी वा कॉर्पोरेट कंपन्यांची पकड आहे. शासन अर्थात दमन यंत्रणा म्हणजे पोलीस, सैन्यदलं त्यांच्याच दावणीला बांधली गेली आहेत. ही जुलमी शासनव्यवस्था उलथून टाकल्यानंतरच या देशात लोकशाही क्रांती होईल त्यानंतरच समाजवादी क्रांतीचा रस्ता मोकळा होईल, या मांडणीवर माओवादाची सशस्त्र चळवळ उभी आहे.
शस्त्राच्या बळावर शासन ताब्यात घ्यायचं तर विचारसरणी वा तत्वज्ञान यापेक्षा व्यूहरचना महत्वाची असते. निव्वळ शस्त्रांच्या आधारे क्रांती करता येत नाही. सशस्त्र संघटना उभारायची तर भाडोत्री गुंड वा बाजारबुणगे उपयोगी नसतात. संघटनेला कोणत्या ना कोणत्या समूहांमध्ये सामाजिक-राजकीय पाया असावा लागतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कामगार वर्ग हा क्रांतीचा वाहक आहे असं मानलं जात होतं. कामगार चळवळ अर्थवादात आणि सनदशीर अर्थात लोकशाही चौकटीत स्थिरावल्याने, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सशस्त्र क्रांतीचा वाहक कामगार नाही तर शेतकरी असेल असं काही मार्क्सवादी-लेनिनवादी गट मानू लागले. शहरांमध्ये शासनयंत्रणा मजबूत असते. पोलीस वा निमलष्करी दलांच्या हालचाली वेगाने होऊ शकतात. त्यामुळेच शासनव्यवस्था जिथे दुर्बळ आहे तिथे संघटन उभारणी करून शासनाला जेरीस आणणं अशी व्यूहरचना आखण्यात आली. ग्रामीण भागापर्यंत लोकशाही व्यवस्थेचे थोडे-फार फायदे पोहोचू लागल्याने आदिवासी समूहांना क्रांतीचे वाहक बनवणं तुलनेने सोपं असल्याचं क्रांतीकारकांच्या ध्यानी आलं. आदिवासींच्या शेतीतून अतिरिक्त उत्पादन होत नसल्याने त्यांचा बाजारपेठेशी संबंध नाही. प्रदेश दुर्गम असल्याने तिथे शासनयंत्रणा सर्वाधिक दुर्बळ आहे. नेपाळपासून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आदिवासी भागांना जोडणारा सलग पट्टा निर्माण करता येईल हे ध्यानी घेऊन दंडकारण्य राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली. आदिवासींमध्ये जातिव्यवस्था नसल्याने या समाजात अंतर्विरोध नाहीत ही बाब संघटन उभारणीसाठी उपयुक्त ठरते हेही ध्यानात घेऊन सशस्त्र क्रांतीकारकांनी आपली रणनीती आखली. यथावकाश नक्षलवादी, मार्क्सवादी-लेनिनवादी यांचं नामकरण माओवादी असं झालं.
संपूर्ण भारतातील सत्ता शस्त्राच्या बळावर ताब्यात घेणं हे माओवादी चळवळीचं उद्दिष्ट नाही. भारत या देशाच्या शासनाशी म्हणजे पोलीस तसेच सैन्य दलांशी स्पर्धा करणं अशक्यप्राय बाब आहे, याची खूणगाठ या चळवळीने बांधली आहे. देशाचे तुकडे झाले तरच शासनयंत्रणा अतिशय दुर्बळ होऊ शकते. त्यामुळेच देशातील प्रत्येक फुटीरतावादी चळवळीशी माओवाद्यांनी संबंध जोडले. त्यामुळे शस्त्रांचा पुरवठा आणि सशस्त्र लढ्याच्या प्रशिक्षणाची गरज काही प्रमाणात भागवता येऊ लागली. आदिवासी प्रदेशामध्येच विविध प्रकारची खनिज संपत्ती आहे. १९९० नंतर उदारीकरणाच्या धोरणामुळे या खाणी आणि उद्योग क्षेत्रात खाजगी गुंतवणूकीला संधी मिळाली. साहजिकच अनेक देशी-विदेशी कंपन्यांना नफ्यासाठी मोकळं रान मिळालं. त्यांचा आदिवासी प्रदेशातला प्रवेश सुकर करण्यासाठी सरकारने कंबर कसली. आदिवासींना या प्रदेशातून हुसकावून लावण्याचे कार्यक्रम (उदा. सलवा जुडूम) सरकारने पद्धतशीरपणे राबवले. जंगल, जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांवर आपला अधिकार वा नियंत्रण असलं पाह्यजे, ही जाणीव आदिवासींमध्ये जागवली माओवाद्यांनी. त्यामुळे त्यांना आदिवासी समूहांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली. या प्रदेशात भांडवलदार वा त्यांचे एजंट यांना माओवाद्यांनी लक्ष्य केलेलं नाही. माओवाद्यांनी सरकार म्हणजे पोलीस आणि निमलष्करी दलं यांच्याशी लढा पुकारला.
सरकारने दडपशाही सुरु केल्यावर आदिवासी समूह साहजिकच माओवाद्यांकडे ढकलले जाऊ लागले. पोलिस वा निमलष्करी दलं यांना माओवाद्यांनी अनेक प्रदेशात जवळपास नमवलं आहे. माओवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्यदलांचा वापर करावा असा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. माओवाद्यांच्या सापळ्यात सरकार अलगदपणे फसत आहे. लष्कराच्या आगमनानंतर आदिवासी प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही होईल. माओवाद्यांना मिळणारा आदिवासी समूहांचा पाठिंबा आणि सहानुभूती मोठ्या प्रमाणावर वाढेल. मणिपूर वा काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण होईल.
चेराबंडा राजू झाड कसं तोडावं हे सांगत नाही तर घराचा प्रश्न सोडवा हे सांगतोय. आदिवासी विकास योजना आणि त्यांचे कागदी घोडे नाचवून आपली लोकशाही बळकट होणार नाही. जंगल, जमीन आणि पाणी यावर आपलं नियंत्रण आहे हे आदिवासींच्या अनुभवाला यायला हवं. ऊन, पाऊस जसा आपल्याला दिसतो, जाणवतो तसं. साक्षात. माओवाद्यांचा पाडाव करण्यासाठी बळाचा वापर करताना याचं भान राज्यसंस्थेने ठेवायला हवं.

टीप : प्रधान मास्तरांचं चरित्र-कार्य, अल्प परिचय कोणत्याही वृत्तपत्रात वाचा
आधुनिक भारत आणि सत्याग्रही समाजवाद हे आचार्य जावडेकरांचे दोन महत्वाचे ग्रंथ. हिंदुस्थानातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारापासून म. गांधीच्या नेतृत्वाखालील स्वांतत्र्य चळवळ या वाटचालीची चिकित्सा आचार्य जावडेकरांनी आधुनिक भारत या ग्रंथामध्ये केली. आधुनिक भारत हा इतिहास नाही, विविध विचारधारा आणि त्यांचा सामाजिक-राजकीय आधार यांचा साक्षेपी आढावा आहे. या ग्रंथातच आचार्यांनी सत्याग्रही समाजवाद या संकल्पनेची मांडणी केली. मार्क्सवाद आणि गांधी विचार यांच्या समन्वयाचा प्रयत्न म्हणजे सत्याग्रही समाजवाद. सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, सत्तेचे लाभ घेणार नाही परंतु बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी सत्तेवर अंकुश ठेवणार्या समतोल बुद्धीच्या यतिवर्गाची कल्पना भागवतांनी आधुनिक भारत या ग्रंथात मांडली. सत्याग्रही समाजवाद या ग्रंथामध्ये हीच संकल्पना अधिक विस्ताराने विशद केली. भारतातील नाही तरी महाराष्ट्रातील समाजवादी आंदोलनावर भागवतांच्या मांडणीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच निष्कलंक चारित्र्य, समाजवादी कार्यक्रमाशी अर्थातच आर्थिक-राजकीय सत्तेमध्ये बहुजनांना सर्वाधिक वाटा मिळावा यासाठी संघटन, रचना आणि संघर्ष, निवडणुकीच्या राजकारणातही या दोन्ही तत्वांचं भान ठेवणं. राजकीय सत्ता नाकारण्याचीही हिंमत दाखवणं, निवडणूकीचं राजकारण अंतिम नाही याबाबत स्पष्टता बाळगून निवडणूकीनंतर वा निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावरही कार्यरत असणं, ही वैशिष्ट्यं महाराष्ट्रातील समाजवादी नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, बाबा आढाव, मधु दंडवते, मधु लिमये अशी अनेक नेत्यांची नावं या संदर्भात घेता येतात. त्यापैकीच एक ग. प्र. प्रधान.
प्रधान मास्तरांवर आचार्य जावडेकरांचा म्हणजे त्यांच्या विचारधनाचा आणि भूमिकेचा खोलवर परिणाम होता. आधुनिक भारताचा उत्तरार्ध लिहिण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि आपला आवाका काय आहे याची वास्तववादी जाणीवही होती. साता उत्तराची कहाणी या ग्रंथात प्रधान मास्तरांनी १९४२ ची चळवळ ते जनता पक्षाच्या सत्तेचा उदय आणि अस्त, असा मोठा कालखंड पकडण्याचा प्रयत्न केला. आचार्य भागवतांप्रमाणे समाजवादी आंदोलनाला वैचारिक मार्गदर्शन करण्याची, सिद्धांत मांडण्याची प्रज्ञा आपल्याकडे नाही याची नम्र जाणीव प्रधान मास्तरांना होती. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक वाटचालीची चिकित्सा नाही तर आढावा घेण्यासाठी आणि तो सामान्य वाचकाला पचनी पडेल अशा तर्हेने लिहिण्यासाठी कादंबरीसदृश्य घाट निवडला. साता उत्तराची कहाणी ही राजकीय कादंबरी नाही वा इतिहास नाही. देशातील राजकीय, सामाजिक स्थित्यंतराचा चिकित्सक आढावाही नाही. या पुस्तकाने समाजवादी विचाराच्या तरुणांना राजकीय पैस काय असतो याचं भान दिलं. प्रधान मास्तरांची बहुतेक ग्रंथसंपदा स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय-सामाजिक प्रवाहांची वैचारिक बैठक यांचा आढावा घेणारीच आहे.
आधुनिक भारत या ग्रंथात आचार्य जावडेकरांनी म. जोतिराव फुले यांच्या कार्याकडे काणाडोळाच केला आहे. खेडोपाड्यात पोचलेली समाजसुधारणेची पहिली चळवळ असा सत्यशोधक चळवळीचा उल्लेख त्यांनी जरूर केला पण चार-दोन पानातच त्यांनी हा अध्याय संपवून टाकला. त्यांना टिळकांबद्दल अधिक ममत्व होतं. प्रधान मास्तरांनाही टिळकांबद्दल ममत्व होतंच पण त्यांना सामाजिक प्रश्नांबद्दल आणि म्हणूनच म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित चळवळ, मागासवर्गीयांचे प्रश्न आणि आंदोलनं यासंबंधात विशेष आस्था होती.
प्रधान मास्तरांनी त्यांच्या पिढीला उद्देशून फारच कमी लिखाण केलं. राष्ट्र सेवा दलाचे बौद्धिक प्रमुख असल्याने राजकीय जाण असलेला समाजवादी वा सेवादलातला तरूण हाच त्यांचा वाचक होता. त्यांचं बहुतेक सर्व लिखाण याच वाचकवर्गासाठी आहे. (ही प्रेरणा त्यांनी साने गुरुजींकडून घेतली असावी). मी त्याच वाचकवर्गात होतो. आमच्या पुढच्या पिढीत प्रधान मास्तरांचे वाचक आहेत का? मला वाटतं फारच कमी. प्रधान मास्तरांना ज्या विषयात रस होता, ते ज्या आकांक्षांना संबोधित करत होते त्याच्याशी नव्या पिढीचा सांधा जुळत नाही. जुळणारही नाही.
टीपः या टिपणात मी आचार्य जावडेकर यांच्याऐवजी आचार्य भागवत यांचं नाव लिहिलं होतं. ही चूक माझे वडील, राम तांबे, अभय कांता आणि अनिल अवचट यांनी ध्यानी आणून दिली. चुकीची दुरुस्ती मी केली नाही कारण अभयच्या प्रतिक्रीयेच्या उत्तरात मी माफी मागितली. मात्र ब्लॉग वाचणारे प्रतिक्रीया वाचतीलच असं नाही हे अनिलच्या मेलवरून ध्यानी आलं. म्हणून ब्लॉगच्या टिपणात दुरुस्ती करून वाचकांची पुन्हा एकदा माफी मागतो.
सुनील तांबे

Tuesday, 25 May 2010
भाषा बदलली की जीवनाचं ज्ञानही बदलतं?
डोक्याला मुंडासं, डोळ्यांवर गोल काड्यांचा चष्मा, उभ्या रेघांचा शर्ट त्यावर कोट आणि गळ्याभोवती उपरणं. हे चित्र होतं, लोणची आणि लोणच्याचा मसाला बनवणार्या कंपनीच्या संस्थापकाचं. (तो मराठी भाषक होता.) त्याच्यासोबत जाहिरातीचा मजकूर—बाजारीच परंतु उंची मसाल्याचे पदार्थ आणून त्यांनी मसाले आणि लोणची बनवायला सुरुवात केली. मासिकातल्या जाहिरातीचं हे वर्णन आहे. मी शाळेत असताना अनेक मासिकांमध्ये ही जाहीरात पाह्यला मिळायची. लोणची, लोणच्याचा मसाला हे उत्पादन बाजारातच विकणार, त्यासाठी लागणारा कच्चा माल बाजारातूनच विकत घेणार पण बाजाराबद्दल मराठी माणसाला तितकासा विश्वास नव्हता त्यामुळे आमचं उत्पादन घरगुती आहे म्हणजे निगुतीने बनवलेलं आहे, असं एक कंपनी सांगत होती.
बाजार या शब्दाचं मराठी भाषेला प्रेम नाही. बाजारबसवी हा शब्द वानगीदाखल दाखवता येतो. मुंबईतले कोकणी लोक रविवारी मासळी आणायचे. त्याला बाजार केला असं म्हणायचे. माझे सासरे अजूनही घरात मासळीचं जेवण झालं की म्हणतात, बाजार चांगला होता. म्हणजे मासे वगळता सर्व पदार्थ वा जिनसा जणू घरातल्याच असतात. बाजार म्हणजे टाळता न येण्याजोगं पाप त्यामुळे त्याचं जीवनातलं स्थान जेवढं कमी तेवढं उत्तम, अशीच मराठी भाषेची धारणा असावी.
जमीनदारी-भांडवलदारी नष्ट कराया चला रं, असं गाणं सेवादलात असताना सुरेश पगारेने रचलं होतं. आम्ही ते म्हणायचोही उत्साहात. जमीनदार हा शेतकर्यांचं, म्हणजे जमीन कसणार्यांचं शोषण करणारा असं भाषेतून आमच्या मनावर बिंबवलं गेलं. महाराष्ट्रात जमीनदारी नव्हती. सावकारी होती (अजूनही आहे). गावगाडा या पुस्तकात जमीनदारी हा शब्दच नाही. बिहार, बंगालातली जमीनदारी मराठी भाषेत केव्हा आली हे तपासायला हवं. बळीराजा हा शब्द शेतकर्यासाठी योजला जातो. परंतु हा शब्दही बहुधा दुष्काळी प्रदेशातूनच आला असावा. गंगा, यमुना, सिंधू या नद्यांच्या सुपिक खोर्यांमधल्या शेतकर्यांना बळीराजा हा शब्द ठाऊकही नसेल.
पंजाबात गेलो तेव्हा कळलं की तिथले सावकार शेतकर्यांना जमीनदार म्हणतात. शेती दोन एकर असो की ५० एकर, सर्व जमीनदार असतात. हे जमीनदार अवाच्या सव्वा दराने सावकाराकडून कर्ज घेतात. अनेक कर्जबाजारी जमीनदार आत्महत्या करतात. हिंदी आणि पंजाबी भाषक समूहांचा शेती आणि शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे.
नागालँडमध्ये गेलो तेव्हा माणूस या शब्दाला नागा भाषांमध्ये काय प्रतिशब्द आहे याची चौकशी केली. नागालँडमध्ये १७ प्रमुख जमाती आहेत. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे. सेमा, अंगामी, चाकसांग, आओ या जमातींच्या प्रदेशात मी हिंडलो. तिथे कळलं की सेमा म्हणजे माणूस, अंगामी म्हणजेही माणूसच. म्हणजे जो आपल्या जमातीचा आहे तो माणूस. दुसर्या जमातीचा सदस्य माणूस नाही? प्राणी आहे? आपला शत्रू आहे? की माणूस म्हणजे कोणत्या तरी जमातीचा सदस्य? असे प्रश्न मला पडले.
प्रत्येक भाषेचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. प्रत्येक भाषेचं जीवनाचं ज्ञान वेगळं असतं. म्हणूनच काही भाषा शास्त्रज्ञ म्हणतात की एखादी भाषा नष्ट होते तेव्हा त्या भाषेतल्या ज्ञानाला अवघी मानवजात मुकते. असं अशोक शहाणेने एका ईमेलमध्ये लिहिलं. त्यामुळे या स्मृती जाग्या झाल्या.

Thursday, 6 May 2010
उभी जातिव्यवस्था आडवी होतेय........
जाता जात नाही ती जात. हे उपजत शहाणपण भारतीय समाजाकडे होतं पण देशाच्या नेत्यांकडे नव्हतं. पाश्चात्य देशातील औद्योगिक समाजरचना हा मापदंड मानल्याने जातिव्यवस्था निर्मूलनाचं स्वप्न हा आदर्श मानण्यात आला. २० व्या शतकात आपल्या देशात जाती तोडो चळवळी झाल्या. २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात खानेसुमारीमध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव, लिंग, धर्म, भाषा यासोबत जातीचाही समावेश करावा का अशी चर्चा सुरु झाली आहे. काही राजकीय पक्ष आणि नेत्यांचा या मागणीला पाठिंबा आहे तर काहींचा विरोध आहे. खानेसुमारीत जातीची नोंद झाली तर जातीपातीच्या भिंती अधिक मजबूत होतील अशी भीती अनेक विचारवंतांना वाटू लागली आहे.
जात या संस्थेची प्रमुख लक्षणं......
1. जन्माने जात प्राप्त होते
2. जातीशी संबंधीत उपजिविका वा व्यवसाय असतो
3. रोटी-बेटी व्यवहार जातीमध्येच होतात
4. जातींची उतरंड असते. प्रत्येक जात कोणत्या तरी अन्य जातीपेक्षा श्रेष्ठ असते आणि कनिष्ठही असते. अगदी ब्राह्मणांमध्येही हा उच्चनीच भाव आहे.
या चार लक्षणांपैकी एकही लक्षण आधुनिक भारतात जात ठरवण्यासाठी लागू पडत नाही. ब्राह्मण पुरुषाशी अन्य जातीतल्या स्त्रीने विवाह केला की ती ब्राह्मण ठरते. म्हणजेच जात केवळ जन्माने नाही तर विवाहानेही प्राप्त होते.
जातीशी संबंधीत उपजिविका वा व्यवसाय या तत्वाला स्वतंत्र भारतात घटनात्मक आणि कायदेशीर आधार नाही. गुजरातेत दलित चेंबर्स ऑफ कॉमर्स आहे.
रोटी-बेटी व्यवहार जातीमध्येच झाले पाहिजेत यालाही घटनात्मक वा कायदेशीर आधार नाही. किंबहुना गेल्या काही वर्षांमध्ये आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढलेलं आहे. ते वाढतच जाणार आहे.
जातींची उतरंड असते हे खरं आहे पण त्याला असलेला धर्माचा, कायद्याचा आधार नेस्तनाबूत झाला आहे. मागास जातींना मागास म्हणून हिणवणं हा कायद्याने गुन्हा आहे. उभी जातिव्यवस्था आडवी होण्याची सुरुवात ब्रिटीशांच्या आगमनाने म्हणजे औद्योगीकरणाने झाली. तीच प्रक्रिया स्वातंत्र्योत्तर काळात सुरु राह्यली. एकविसाव्या शतकात याच प्रक्रियेने वेग घेतला आहे.
राष्ट्रीय संपत्तीचा अधिकाधिक वाटा आपल्याला मिळावा यासाठी विविध समूहांमध्ये जी रस्सीखेच सुरु असते त्यालाच राजकारण म्हणतात. संपत्तीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली तर प्रश्नच निकालात निघेल तोपर्यंत जात, धर्म, वर्ग, लिंगभाव यांचं राजकारण दूर ठेवावं असा प्रस्थापितांचा नेहमीच प्रयत्न असतो. परंतु समाजवास्तव नेहमीच गुंतागुंतीचं असतं. जात, धर्म, लिंगभाव (महिला आरक्षण विधेयक), वर्ग यावर आधारित राजकारण देशाच्या एकात्मतेला, प्रगतीला खीळ घालणारं आहे, असाही प्रस्थापितांचा समज असतो. उभी जातिव्यवस्था आडवी होताना असे अनेक संघर्ष निर्माण होणारच. त्यामुळे जातिव्यवस्था पुन्हा बळकट होईल अशी भीती अनाठायी आहे. जात ही संस्था लवचिक आहे. वर सांगितलेली जातिव्यवस्थेची लक्षणं समाजशास्त्रज्ञांनी ब्रिटीशांच्या आगमनापूर्वीच्या जातिव्यवस्थेचं आकलन करण्यासाठी निश्चित केली. जातिव्यवस्थेची ही व अन्य लक्षणं एकाच कालखंडात लागू झाली नव्हती. शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांवर ही लक्षणं जातिव्यवस्थेने आत्मसात केली असावीत. या चार लक्षणांच्या पलिकडे जात नावाचं वास्तव शिल्लक असतं कारण जात ही एक उपसंस्कृती असते. आपल्या देशातील सांस्कृतिक विविधता त्यामुळेच आहे. देशनिर्मितीची प्रक्रिया प्रदीर्घकाळ चालणारी असते. आपल्या देशाला जरी हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे. मात्र राजकीयदृष्ट्या देश निर्मितीची प्रक्रिया १९४७ साली, आणि नेमकेपणे बोलायचं तर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारल्यावर सुरु झाली हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
२०१० च्या खानेसुमारीत जातीची नोंद करण्याचा निर्णय झाला तर अनेक छोट्या जाती स्वतःला मोठ्या जातींमध्ये विलीन करून आपआपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतील. (ब्रिटीशांनी भारतीयांना राज्यकारभारात सहभागी करून घेण्यासाठी कायदेशीर तरतूदी करताना ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी मेख मारली. त्यामुळे अनेक जाती स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागल्या तर काहींनी स्वतःला मराठा जातीत विलीन केलं. १९२० च्या पूर्वी महाराष्ट्रात मराठा नावाची जात नव्हती. असो.)
गुणवत्तेला डावलणं हा जातिवर आधारित आरक्षणामध्ये सर्वात मोठा दोष आहे. औद्योगिक समाज हा गुणवत्तेला प्राधान्य देणारा असतो. पुढच्या काळात नोकर्यांपेक्षा उद्यमशीलतेलाच महत्व येणार आहे. त्यामुळे गुणवत्ता आणि जातीवर आधारित आरक्षण यांची सांगड समाजाला घालावी लागेलच.

Saturday, 24 April 2010
आयपीएलची सुलतानी
• • आयपीएलच्या संघांची नावं पहा-डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्ज इलेवन, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स, कोलकता नाइट रायडर्स. मुंबई इंडियन आणि दिल्ली डेअर डेविल्स ही दोन नावं वगळता प्रत्येक संघाला म्हणजे संघाच्या मालकांना राजे, सरदार, सेनापती यांचंच आकर्षण आहे.
• रोमन सम्राट भल्यामोठ्या स्टेडियममध्ये ग्लॅडिएटर्सच्या झुंजी लावायचे. क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, टेनिसपटू यांनी आता ग्लॅडीएटर्सची जागा घेतली आहे. रोमन सम्राटांच्या जागा शरद पवार, ललित मोदी, विजय मल्ल्या, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांनी पटकावल्या आहेत.
• स्त्रियांना चेटकीण ठरवून जाळण्याची परंपरा युरोपात होती. आशियातही होती. भारतात तर अजूनही आहे. ललित मोदींनी नेमकं हेच अस्त्र वापरून सुनंदा पुष्करला शिंदळ ठरवली. माध्यम होतं २१ व्या शतकातलं. ट्विटर.
• राजदीप सरदेसाई, अर्णब गोस्वामी, एम. जे. अकबर यासारख्या तथाकथित उदारमतवादी वा प्रागतिक विचाराच्या संपादकांच्या मनाच्या सांदीकोपर्यात सरंजामशाहीच दडून बसलेली आहे, हे आयपीएलच्या निमित्ताने स्पष्ट झालं. सुनंदा पुष्करचं व्यावसायिक यश यांच्यापैकी एकाही संपादकाने ध्यानात घेतलं नाही. संपादकांनी शब्द जपून, मोजून मापूनच वापरले. त्यांना शब्दांत पकडता येणार नाही पण वृत्तवाहिन्या वारंवार प्रसारीत करत असलेली दृष्यं संपादकांचा दृष्टीकोन मांडत असतात.
• शशी थरूरना राजीनामा द्यायला लागल्यावर सरकार नावाची संस्था जागी झाली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणून. ललित मोदी सरकार नावाच्या संस्थेला आव्हान देतो म्हणून वेगवेगळ्या खात्यांनी आयपीएल आणि संबंधीत कंपन्यांची चौकशी सुरु केली. तोवर सर्व आलबेलच होतं.
• आयपीएलची एक टीम पदरी बाळगता येईल एवढा पैसा प्रफुल पटेलांकडे आहे. विजय मल्ल्यांनी तर एक टीम पाळलेली आहेच. पण या दोघांच्या मुली (मल्ल्यांची सावत्र मुलगी) पॉकेट मनी मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये नोकरी करतात. आपला आयपीएलशी संबंध नाही हा पटेलांचा दावा फक्त पवार (आणि पवारवादी) यांनाच पटेल.
• सुप्रिया पवार यांच्या नवर्याचं, सदानंद सुळे यांचं नाव या वादात ओढलं गेलं. त्याबद्दल मिडियाला कोर्टात खेचण्याची धमकी त्यांनी दिली होती. पण वस्तुस्थिती पुढे आल्यावर त्यांनी माघार घेतली. नातेवाईकबाजी हे सुलतानशाहीचं, सरंजामशाहीचंच लक्षण आहे.
• मॅचच्या तिकिटांचे दर भीषण महाग. मॅच पाह्यला येणार्यांना पाण्याची बाटलीसुद्धा बरोबर ठेवण्याची मुभा नाही. १२ रुपयांची बाटली २००-३५० रुपयाला विकत घ्यायची. सामना संपल्यानंतरच्या पार्टीच्या तिकीटाचे पैसे. तिकीटांचा काळाबाजार. प्रसारणाचे हक्क, स्टेडियमवरच्या सोडाच पण प्रसारणातल्या जाहीरातींचे हक्क, मल्टिप्लेक्सेसमध्ये सामना पाहण्याचे हक्क, त्रिमिती प्रसारणाचे हक्क, शर्ट, टोप्या, इत्यादींचे हक्क. मॅच फिक्सिंगचाही आरोप आयपीएलवर होतो आहेच. आयपीएलने अब्जावधी रुपये निर्माण केले. अर्थात त्यातून संपत्ती किती निर्माण झाली ह्याचा हिशेब कोणीही मांडलेला नाही. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नव्हे तर त्याची गुंतवणूक करून अधिक काळा पैसा निर्माण करण्यासाठी आयपीएल हा कदाचित् या शतकातला सर्वात मोठा उद्योग ठरेल. युरोपातले फुटबॉल क्लब, अमेरिकेतले बास्केटबॉल वा बेसबॉलचे संघ या सर्वांच्या तोंडात मारेल असं यश आयपीएलने मिळवलं. प्रगत औद्योगिक राष्ट्रांना नामोहरम करण्याची ही युक्ती भारतासारख्या विकसनशील देशांने शोधली. हे शरद पवारांचं योगदान.
• महाराष्ट्र शासनाने मात्र षट्कार ठोकला आहे. आयपीएलची निर्मितीच करमणूक आणि करमणूकीतून अब्जावधी रुपये कमावण्यासाठी झाली. मात्र महाराष्ट्र शासनाने आयपीएलच्या सामन्यांना करमणूक कर लावण्याबाबत अजून निर्णयच घेतलेला नाही. शासन कोणत्या का पक्षाचं असेना ते नक्कीच आधुनिक वा औद्योगिक समाजाचं नाही. राजाच्या लहरीनुसार निर्णय घेणारं आहे.

Subscribe to:
Posts (Atom)