Blog Archive

Monday 19 October 2009

दिवाळी अंक वाचतो कोण?

माझे आई-वडील दोन-चार दिवाळी अंक विकत घेतात. बाकीचे लायब्रीतून आणतात. माझ्या
सासू-सास-यांकडेही चार दिवाळी अंक असतातच. माझ्या घरी दोन-तीन दिवाळी अंक येतात. माझ्या भावाच्या आणि चुलतभावाच्या घरीही दिवाळी अंकांची एवढीच संख्या असते. म्हणजे आमच्या विस्तारीत कुटुंबात १२ ते १५ दिवाळी अंक असतात. इयत्ता चौथीत असलेला एक पुतण्या हातात पडेल तो कागद वाचून काढतो. तो अर्थातच दिवाळी अंकही वाचतो. माझा मुलगा मात्र दिवाळी अंक वाचत नाही. माझे दोन-तीन पुणतेही दिवाळी अंक वाचत नाहीत. दिवाळी अंकातले लेख वाचण्यापेक्षा वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचावेत आणि कथा तर पकावच असतात असं माझा मुलगा म्हणतो.

सरकारी वा खाजगी नोकरीत असलेल्या मध्यमवर्गीय माणसांकडे वेळ भरपूर होता. त्यावेळी ऑफिसला जाण्या-येण्यामध्ये फारसा वेळ जायचा नाही. एकदा का तुम्ही कारकून वा अधिकारी म्हणून नोकरीत चिकटलात की करिअर डेव्हलपमेंटला फारशी संधी नव्हती. नोकरी करून राह्यलेल्या या वेळाचा सदुपयोग म्हणजे उत्तमोत्तम नाटक वा सिनेमा पाहणं, गाण्याच्या मैफिलीला जाणं, वृत्तपत्र विशेषतः अग्रलेखाचं पान नियमाने वाचणं, त्यावर चर्चा करणं, नाटक, सिनेमा, साहित्य या क्षेत्रात जे नवे प्रयोग होतात त्यांची दखल घेणं, परिसंवाद, भाषणं यांना हजेरी लावणं, असं या मध्यमवर्गाचं स्वरूप होतं. प्रत्येक विषयातलं थोडंफार तरी आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या संवेदनांचा विस्तार केला पाहिजे, अशी धारणा असणा-याला सुसंस्कृत म्हणण्याचा प्रघात होता. काही जण त्यांना विद्वान असंही म्हणत.

जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये एंटरटेनमेंट, कॉमेडी, ट्रॅजेडी, क्राईम, सस्पेन्स, रोमान्स, ह्यूमर सर्वकाही एकाच चित्रपटात कोंबलं जायचं. दिवाळी अंकांचं म्हणजे तथाकथित दर्जेदार दिवाळी अंकांचं स्वरूपही अशाच प्रकारचं होतं. चालू घडामोडींविषयक एक परिसंवाद वा विशेष विभाग, वैचारिक लेख, नाटक, चित्रपट, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत या विषयांना स्पर्श, नामवंत आणि नवोदितांच्या कथा-कवितांची भेळ, एखादी कादंबरी, नर्म विनोदाचा शिडकावा, दृष्यकलांची दखल असा दिवाळी अंकांच्या यशाचा फॉर्म्युला होता. दिवाळी अंकांचं अर्थशास्त्र जाहिरात मिळवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. वाचक असोत वा नसोत, वर्षातून एक जाहिरात अनेक कंपन्या, बँका वा छोटे-मोठे जाहिरातदार सांस्कृतिक कर्तव्य म्हणून देतात, त्यामुळे दिवाळी अंकांचं संपादन, लेखन, मांडणी, सजावट, निर्मिती यासंबंधात अनेकविध प्रयोगही केले जातात.

मराठी पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि चित्रपट अशा निवडक विषयांशी संबंधीत असणारे व्यावसायिकच दिवाळी अंक गांभिर्याने वाचतात. त्यांना या अंकांच्या मजकूरातून अनेक नव्या संकल्पना, कल्पना, माहिती, प्रेरणा मिळतात. दिवाळी अंकात विज्ञान, निसर्ग, तंत्रज्ञान, दृष्यकला—चित्र, शिल्प, वास्तुकला, आरोग्य, क्रिडा, अर्थशास्त्र असे विषयही हाताळलेले असतात. परंतु त्यांचं स्वरूप मध्यमवर्गीय वाचकाला नव्या विषयांचा परिचय करून देणं हे असतं. अर्थातच या विषयातील व्यावसायिक दिवाळी अंक आवर्जून वाचत नाहीत. या विषयांमधील वा क्षेत्रांमधील नव्या संकल्पना, संशोधन वा प्रयोग यामध्ये गुंतलेले तरूण-तरूणी वा अन्य वयोगटातील वाचकांना दिवाळी अंकांच्या वाचनातून फारसं काही हाती लागत नाही.

माझा मुलगा, पुतणे वा पुतण्या यांच्या इंटरेस्टचे विषय लिंकीग पार्क, वेस्ट लाइफ, एमीनेम हे बँड्स, युरोपियन फुटबॉल, टेक्नॉलाजी म्हणजे मोबाईल फोन, आयपॉड, हँडीकॅम्स, हाय स्पीड इंटरनेट, कंप्युटर वा मोबाईल फोन गेम्स, म्युझिक सिस्टीम्स, सोशल नेटवर्किंग साइट्स हे आहेत. महाराष्ट्रात इंजिनीयरींग अभ्यासक्रमाच्या एकूण ४० हजार जागा आहेत, मेडिकल वा अन्य प्रोफेशनल कोर्सेसबाबतही अशीच स्थिती आहे. करिअरच्या दृष्टीने मॅनेजमेंट हे क्षेत्र आता महत्वाचं ठरू पाहात आहे. या तरूणांची अभिरूची, संवेदनशीलता यापेक्षाही त्यांच्या इंटरेस्टना दिवाळी अंक संबोधित करत नाहीत. हे विषय मराठी संवेदनशीलतेच्या परिघात नाहीत. दिवाळी अंकांच्या संपादकांना यापैकी अनेक विषय माहीतच नाहीत. या विषयांवर अधिकाराने लिखाण करणारे लेखकही मराठीत नाहीत. या विषयांवर उदंड साहित्य इंटरनेटवर उपलब्ध असतं. टिव्ही, एफएम रेडीयो, इंटरनेट, मोबाईल फोन या माध्यमांची दोस्ती करणारा तरूण सध्याच्या काळात करिअरिस्ट असतो. हा तरूण दिवाळी अंकांचा वाचक नसतो.

मराठी पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा या क्षेत्रात करिअर करू पाहणा-या तरूणांची संख्या तुलनेने कमी असते. कारण तिथे रिस्क फॅक्टर मोठा असतो. शैक्षणिक वा तांत्रिक कौशल्यं याहीपेक्षा अन्य काही बाबी तिथे यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या ठरतात. तरूण-तरुणींचा हा छोटा वर्ग आणि चाळिशी पार केलेले स्त्री-पुरुष हा दिवाळी अंकांचा वाचक असतो. तुमची काय निरिक्षणं आहेत?

10 comments:

  1. अगदी बरोबर. पण करिअर एकदा का सेटल झाले आणि ब्रायन ऍडम्स, लिंकिन पार्क मेटॅलिका एक्दा का ऐकून बोर झाले की मुलं क्लासिकल व नाट्य संगीताकडे वळू शकतात. किमान माझ्ं तरी तसं झालं.
    "आपलं काय आहे" हे कळल्यावर अपोआप जाण येते.

    ReplyDelete
  2. true... gen x wont go for it... it's time to do some reality check for these anks...the upholders of cultural legacies have to reinvent themseleves...the divali ank must address the aspitations and concerns of the youth...
    how?... some thoughts...:most professional courses such as Film and TV courses, management courses and so on have to take up assignment/projects.. even non professional generic grad courses too have this feature.. most of the times these students are given irrelevant.. drab topics.. students in turn rehash what's already available on the web... these colleges can be approached with a proposal- of looking into the diwali ank- content, design, distribution- they can talk to their peers...get feedback... based on the feed back get them to design one....

    ReplyDelete
  3. निरीक्षणं अचूक आहेत. एकूण या अंकांचा परीघ मर्यादीत असतो हे खरंच आहे. त्यामुळे सांस्कृतिक भूक भागविण्याची शिदोरी, अशा भाबड्या भावनेने कोणी हे अंक आता वाचत असतील, असं काही वाटत नाही. अर्थात अंक अगदीच टाकाऊ असतात असं नाही. मी आणि माझ्यासारखे अनेकजण निवडक अंक अगदी आवडीने वाचतोच. पण लहानपणी जसं अप्रूप असायचं तसं आता काही राहिलं नाही. आम्ही जरा प्रॅक्टिकल झालोय. त्यामुळे साप्ताहिक सकाळसारखे अंक आता कुठंच भिडत नाहीत. बाकीच्या अंकांतले अनेक लेख खरंच चांगले वाटले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने जो काही धांडोळा लोकसत्ता, मटा ने घेतला आहे त्यातून बरंच काही मिळालं. दिवाळी अंकांमुळे जाणीवा समृध्द वगैरे होत नाहीत हे खरंच आहे, पण माहितीचा एक स्त्रोत आहे, कधी कधी नवीन दृष्टिकोनाचा परिचय होतो, इनसाईट मिळते. तुम्ही उल्लेख केलाय ती मध्यमवर्गीय वाचक वृत्ती - प्रत्येक क्षेत्रातलं थोडं थोडं तरी कळालं पाहिजे, संवेदनांचा विस्तार केला पाहिजे- ती सोडून दिली तर बराच गुंता सुटेल, असं मला वाटतं.

    ReplyDelete
  4. true.. gen x wont go for it.. time to do some reality check for divali anks.. they must reflect the aspiration and concerns of the youth and their expressions of these. The upholders of the cultural legecies must reinvent themselves...
    how? some thoughts...
    professional courses such as Film/ TV/ business management, IT, engineering ... have to take up social assignments/projects.. even generic grad courses too have this feature, most of the times irrelevant/drab topics are given. students in turn rehash what's already available on the web... these colleges can be approached with a proposal... students can look into the content, design, distribution of the divali anks, they can talk to their peers, get their feedback, get them to design anks basis the feedback...

    ReplyDelete
  5. I am a new follower of this blog and its my first time to follow any blog! The medium is new - and reading it in Marathi adds a big nostalgia factor. I am gratified to find a medium that lets me tune into "what is hot and what is not" in Mumbai. I am so overwhelmed that I cant really see past it to comment on the content. Though one thing does come to mind: Irrelevant magazines - or magazines heading that way, is not a new phenomenon limited to Diwali Anka. That's capitalism for you. "Free markets" are supposed to be efficient -- they rearely are. They CAN and often do create, ill-advised and well-funded enterprises. Agreed that Diwali Anka may have fulfilled a widespread need at some point. Does your "diwali anka" subscription ever feel burdensome like say... junk mail? I recently dumped Economic Times and WSJ simply because it was too much money for something I did not have time for. Even nature, forgive the heresy, is an example of a free market. It is chaotic and takes its own time to clean up. Even though I am nostalgic for the "Diwali Anka" in its current and I will regret its demise or morphosis (if that happens) I will welcome its replacement by.... what's next, Blogs?

    ReplyDelete
  6. दिवाळी अंक.
    very difficult to type Marathi in this cumbersome font. I dont know how you manage. I can manage small, inane messages, but not longer, complicated ones.
    To take your implied message seriously and to stretch it further logically, Diwali issues will have to be brought out in English and will have to devote most space to western bands, modern technology, cyber world and video games. Now, all this is available free on the Net. More and better content is available in American magazines. Local Diwali issues cannot hope to compete with them.
    So, what is the issue? Are you trying to suggest that the subjects covered by Diwali magazines are side issues? That they are irrelevant to the majority, the 'Marathi opinion makers', the 'doers', the 'today generation'?
    And that Nemade is a naive optimist with a lost cause?
    I think you are being flippant. Take your logic ahead and make a Statement.
    hemu

    ReplyDelete
  7. दिवाळी अंकावरील माझ्या टिपणावर प्रतिक्रिया देणा-या सर्वांचे मनापासून आभार. कोण वाचतो दिवाळी अंक या शीर्षकापेक्षा वाचतो दिवाळी अंकांचा वाचक असं शीर्षक दिलं असतं तर त्यात हेटाळणीचा सूर आला नसता, अशी प्रतिक्रिया एका मित्राने फोनवर कळवली. हेटाळणीचा सूर नसता तर एवढ्या प्रतिक्रियाही आल्या नसत्या.

    दिवाळी अंकांचं स्वरूप आणि त्यांचा वाचक यांच्याबद्दलची काही निरिक्षणं मी मांडली. दिवाळी अंकांनी आजच्या तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी काय करावं हे मी सुचवलेलंही नाही. मुळात प्रश्न दिवाळी अंकांपुरता मर्यादीत नाही. कोणत्याही मराठी नियतकालिकांना ते मुद्दे लागू होतात.

    आश्विनच्या प्रतिक्रियेने या चर्चेला वेगळाच आयाम दिला. वॉल स्ट्रीट जर्नलसारखी नियतकालीकंही वाचकाला अनावश्यक असणारा मजकूर कोंबत असतात. भांडवलशाही, मुक्त बाजारपेठ या बाबी त्याला कारणीभूत आहेत, हे त्याचं निरिक्षणही मार्मिक आहे.

    मराठी ब्लॉगवर अशा प्रकारच्या चर्चा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून माझी कॉमेंट आवरती घेतो.

    कळावे,
    लोभ असावा ही विनंती.
    सुनील

    ReplyDelete
  8. माझा मुलगा, पुतणे वा पुतण्या यांच्या इंटरेस्टचे विषय लिंकीग पार्क, वेस्ट लाइफ, एमीनेम हे बँड्स, युरोपियन फुटबॉल, टेक्नॉलाजी म्हणजे मोबाईल फोन, आयपॉड, हँडीकॅम्स, हाय स्पीड इंटरनेट, कंप्युटर वा मोबाईल फोन गेम्स, म्युझिक सिस्टीम्स, सोशल नेटवर्किंग साइट्स हे आहेत.
    Hya sthiteecha uhapoh karanara ek blog kadheetaree lihee. bahutansha pandharpesha gharanmadhye heech sthitee aahe ! tee lanchhanaspad naahee tasech bhushanavah tar nakkeech naahee... anivarya asavee ! tar tya anivaryatecha vedh swat:pasun samajaparyant ghyayala hava.Baakee diwalee ankanbabatacha tuza nirikshan (purveecha "sade teen takke vaachak" gruheet dharata khar tar hay poorvaapaarach aahe ! aso) hay nimitta/lakshan svaroopacha aahe.

    ReplyDelete
  9. दिवाळी अंक वाचणा-यांचीच पुढची पिढी अशी आहे. आपण म्हणता त्या अनिवार्यतेचाच वेध ब्लॉगमध्ये घेतलाय.

    ReplyDelete
  10. I came across your blog very late.But I would like to post my comment on these Diwali anks. It's true that these Diwali anks have lost their place during the last 5-6 years. This year the condition has deteriorated further. The top most of anks this year such as Antarnaad, Sadhana, Mohini, Saaptaahik Sakaal are not worth as they used to be.One must find the reason of this downtrend.As a reader, I feel saddened and if this trend goes on then, I am afraid that Diwali will come anmd pass without Diwali anks.
    I would like to write to you in Marathi font, but unable to do so. Please let me know your g-mail id.
    Mangesh Nabar

    ReplyDelete