It was the village of sea camels. There were thousands of camels by the sea. They go to sea for grazing. They eat mangroves, said Tejabhai.
I don’t know why there of us—Pramod, Mahesh and I, had gone to that village. Mahesh somehow managed a bedroom on a terrace, the only pucca house in the village. From there, it was a breathtaking view of the camels. The sea was nowhere in sight. It is there beyond the mangroves, said Tejabhai pointing to the thin line of vegetation on the horizon.
Next day, early morning, Mahesh woke me up. He was looking fresh as he had shaved and taken bath. He was wearing coffee color trousers and white full sleevs. He had put on shoes as well. He ordered me to take out pen and woke up Pramod for a piece of paper. “Take down the dictation,” was his next order. I was still dosing but followed it as I sensed the determination and command in his voice.
He gave all the details of his property in Hyderabad with precise instructions. It sounds like a will, I said. He replied with a faint smile on his face. His bed was too tidy as if he had prepared it a few minutes back. He lay on the bed, legs stretched. Goodbye! I am going to die now, he said and died.
Hundreds of camels were returning from the sea. The male folks in the village with tiny milk cans were hunting female camels. I was amazed to discover that everyone managed to find his animals and started milking them. There were no shouts, no fights. “You can milk camel anytime,” said Tejabhai caressing the docile animal. Indeed, the creature was kind-hearted as it was allowing to milk while feeding its offspring from the other udder.
I left for my friend’s place. He was a scientist working with a research institute located along the sea coast. More than him, I was fond of his wife. She was my dearest friend as was their son. It took me hell lot of time to find his place. He had built his home on a rocky stretch and there was no proper approach road. I had to leave the auto quite far and walked through the rocks and sand. There was not a single tree for shade and it was painful to watch azure sea under the criminally hot sun. Neither was there any other house in sight.
I was completely exhausted due heat and weight of the huge suitcase that I was carrying. I reached the home only to find it locked. I waited and waited under the incredibly hot sun. The structure was designed in such a way that nobody would get shade outside the house. For hours together I was there consuming all the cigarettes I had with me. Finally, when I was about to collapse I dragged myself to the deserted road. I was lucky to find an auto there. Before hopping into that rickety vehicle, I glanced at the house by the sea and cursed my friend’s wife. You too will wilt under the sun waiting for me, I said. The driver took me to the hospital instead of a hotel where I was kept on the ice bed for I had suffered from the sunstroke.
In the evening, the scientist’s family arrived. His wife figured out from the cigarette buts strewn outside the house that I was waiting there for a long time. She told the husband that she would not enter home until I arrive. He sympathized for her and said O.K. He and the son, slept in the home leaving her outside. For days together she was there and day by day she was drying up. The scientist and the son did not notice it until she became as thin as leaf. She had already fallen on earth and the wind kept her rolling. The scientist was amazed. He placed her in different spots just for observations. Some weeks later he abandoned this project and took her in the home. She was put on the enormous table in the dining room underneath a glass paperweight so that the wind would not blow her away.
I found myself in an airy bedroom that was lighted by the stars in deep blue sky. The blue bedspread had violet flowers with white border. Under the golden yellow quilt on which red flowers were painted, she hugged and kissed me intensely.
I woke up completely. The room was filled with constant buzzing of ceiling fan and smell of mosquito repellent. In the crammed room, my wife, son and in-laws were in deep sleep. I came out of the flat, went down the stairs, passed the approach road and reached the playground. It was empty. The odor of the wet grass and the pungent smell of cow dung and other waste was floating in the air. My body shivered as the cool breeze touched the body through the linen. I lighted a cigarette with a pretext to shoo away mosquitoes and sat until the daybreak and the mobile phone buzzed.
It was John. He told Kutch was being hit by the cyclone and described it as the calamity of the century. “You should reach there by morning and do anything but the story and pictures should reach me by evening,” he ordered.
I called up the airline office and by dawn I was flying to Kutch with the credit card, laptop, camera equipment and small baggage. I hired a vehicle at the airport and set out to shoot.
The killer cyclone had devastated the coastal part of the district. The death toll was yet to be known but was estimated to the tune of 20,000. Most of them were salt pan workers and port labourers. The sea had thrown huge ships and ocean liners on the bank. The survivors were so stunned by the calamity that they could hardly speak. I came across a man who saw his entire family disappeared in the choppy sea but could not do anything even a scream, to help them. He was admitted in a civil hospital but died of heart attack by afternoon. He was looking like a living dead in the snap.
It was a bumpy drive to the lesser known port as the road was swept by the sea. On right side of the road was the sea and salt pans were on the left. I was startled to find that the railroad linking the port with the mainland which was running parallel to the motor road suddenly disappeared. It was thrown to the other side by the stormy sea. Some mounds of snow white salt had survived the storm. Dead camels, dead crows, dead bullocks, dead donkeys, dead dogs and dead flamingos were strewn across the road and in the salt pans.
I shot four films but there were no labs and I have to buy chemicals from the shop to develop black and white films in the portable kit that I had brought along with the camera. I scanned them and transmitted the pictures and the story to the office, thanks to the government office that had a generator and STD line. I was relieved when John confirmed that the story and pictures landed in the system and I did not miss the deadline.
Most of the hotels rooms in the city were booked by the government for the staff of different departments that was arriving for relief work. There was no electricity and the rooms on the fifth of sixth floor were available. I had not eaten anything since morning and was wondering where to find a room to relax. There I came across an energetic NGO worker. “Here you will not find a place for a night as the district collector has booked all the hotels for government staff,” he said and suggested spending a night in a nearby village.
We motored for about an hour and reached the sea. I was exhausted by continuous touring and working under the hot sun in humid weather. It was so dark that I could barely see the straw huts. In a day’s hard work, they had fixed the roofs swept away by the “Chakravat”, the NGO worker told me. I was feeling sleepy and notice curious faces of villagers around me. One of them offered me a glass of milk. “It’s camel milk,” he said. I looked straight into his eyes. He was about to speak something but I stopped him as a shiver ran through my spine. I said to him in Hindi, “Tejabhai, I know this is the village of sea camels.” That much I could barely speak and fainted for I did not have the courage to face the dream that was coming true.
Tuesday, 26 January 2010
Tuesday, 19 January 2010
कोसी
कोसना म्हणजे छळणे. वारंवार येणार्या पूरांमुळे त्या नदीला नाव पडलं कोसी. आसामवर ब्लॉग लिहिल्यानंतर काही अमराठी मित्रांनी आग्रह केला इंग्रजीत लिहिण्याचा. म्हणून दोन वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली कोसीला आलेल्या पूरानंतर मी इंग्रजीत लिहिलेला एक लेख मिळाला. तोच या ब्लॉगवर टाकतोय.
Kosi : Back to the Future
Yet again, taming of the river, Kosi, in eastern India has been proved futile. On August 18, the mighty river picked up an old channel it had abandoned over 100 years ago. The river broke its embankment in Kusaha in Nepal affecting nearly three million people. Bijendra Prasad Yadav, Water Resources Minister of Bihar said the buck stops at the Kosi High-Level Committee (KHLC) under the Central Government. “The KHLC hugely reduced the estimate submitted by State’s engineers for carrying out the flood protection work at Kusaha,” he said. Hapless people have turned their backs on the modern technology and its vanguard, the government as both of them could hardly address their centuries old woes. They offered sacrifices of animals to pacify the river; some pregnant women who delivered the babies in make-shift relief camps christened their girl child as Koska Maharani (Princess Kosi) or Kosi. They resorted to ancient Indian wisdom of establishing relationship with the nature and natural calamity.
Barh Mukti Abhiyan (Freedom from Flood Campaign) had long back warned against the embankment trap. By building embankments on either side of a river and trying to confine it to its channel, its heavy silt and sand load is made to settle within embanked area itself, raising the riverbed and the flood water level. The embankments too are therefore raised progressively until a limit is reached when it is no longer possible to do so. However, vested interests of the contractors in this God forsaken country prevailed and millions of rupees have been spent on these embankments almost every year.
Kosi originates in the Himalayas and with its tributary Arun brings the greatest amount of sediment load. Once it crosses the mountains, gorges and foothills and enters into plain the sediment load is deposited in an immense alluvial fan that grown to an area of about 15000 square kilometers. Hence Kosi does not have a single well defined channel. It has numerous interlacing channels that shift laterally over the fan from time to time. The Kosi’s alluvial fan has fertile soil and abundant groundwater. The diagnosis and prognosis of this River of Sorrow can be traced into the myths and legends.
Francis Buchanan in “An Account of the District of Purnea in 1809-10” documented one story of the river Kosi. She was said to be the daughter of Kausik Raja. Besides this nymph he had a son Viswamitra, who was strenuous worshiper of Para-Brahma, or the Supreme Being and rejected the worship of the inferior gods. The nymph was married to a Brahmin who prayed to the gods that she be changed into a river.
Another legend says, Kosi was the daughter of God Siva. Although she is worshiped as a mother goddess, she has been described as impudent hussy who leaves her bed every night and reaches out for strange beds. She is the most beautiful teenager on the earth. A huge mighty demon called Rannu Sardar fell in love with her. Amused and surprised, she cleverly put forth a condition that if could contain her (the river) between the Himalayas and her confluence with Ganga in one night’s time, she would accept. The demon agreed and set about his task. With an enormous spade that weighed two tons, he began cutting the banks of the river to contain her flow. As the work progressed Kosi got nervous and rushed to God Siva in the Himalayas. Agreeing to help her, God Siva went, disguised as a rooster and started crowing in the mid-night. The demon thought that morning is approaching. Fearing his life, he threw his spade and ran away. And the Kosi has since continued her unruly flow unchecked. The boat people on the Kosi River believe that Ranu Sardar is trying to achieve his task in the hope of marrying Kosi, one day. That’s how they explain the continuous erosion of the sand banks.
In his path breaking Hindi novel—Parati Parikatha (Fable of Barren land) , Phanishwarnath Renu has documented another story of Kosi. According to this story, Kosi’s maternal home was Paschim Tirhaut (West Tirhaut) and her in-laws home was Purubi (East). She was harassed and tortured by the mother in-law and her two daughters. Kosi fled from the in-laws house for the maternal home. The mother in-law and sisters in-law, tried to stop her by black magic. They tried to arrest her by heavy torrential rains that culminated into the great devastating flood. Kosi, although completely exhausted as she was on the run continuously, struck back with her magical powers that lifted the patch of the earth and saved her from the raging flood. In the process, that huge patch of earth turned into a barren land mass in Purnea district. This folktale tries to explain as to why Kosi is moving from east to west while changing its course.
Renu’s novel ends on the promising note of taming of the river by the modern engineers. Obviously, the Freedom Fighter novelist was deeply impressed by the romanticism of Jawaharlal Nehru. But the River of Sorrow drowned the reputation of the modern engineers in the recent deluge. No wonder that people are turning to the legends and trying to establish relationship with the river. She can be the Goddess, ill mannered teenager or destitute wife. The people inhabiting the alluvial fan of Kosi, don’t want to conquer the nature. They are yearning for the peace with the nature. (The statesmen at Copenhagen are yet to realize this simple truth.)
Thursday, 14 January 2010
भगीरथ आणि एडमंड हिलरी....
भगीरथ ही पुराणकथेतलं पात्र आहे. तपश्चर्येने भगीरथाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली, अशी गोष्ट आहे. पुराणकथा बहुधा लोककथाच असतात. त्यांचा लेखक कुणालाच ठाऊक नसतो कारण त्यांचा एक लेखक नसतोच. या कथेचा काळ बहुधा इसवीसनपूर्व असावा.
एडमंड हिलरी हा मात्र हाडामांसाचा माणूस होता. विसाव्या शतकातला. जगातलं सर्वांत उंच शिखर ज्या जोडगोळीने सर्वप्रथम सर केलं त्यापैकी तो एक.
भगीरथाचा प्रवास गंगेच्या उगमापासून मुखापर्यंत झाला असं पुराणकथा सांगते तर एडमंड हिलरी गंगेच्या मुखापासून उगमापर्यंत प्रवास केला असं इतिहासात नोंदवलं गेलंय.
भगीरथाची गोष्ट बहुधा ऐकूनच माहीती असते. चांदोबा, मुलांची मासिकं, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आणि आता टेलिव्हीजन या माध्यमांद्वारे भगीरथाच्या गोष्टीचा प्रचार प्रसार होतो.
एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग भूगोलाच्या पुस्तकात, मुलांच्या मासिकात, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, बातम्या, अनेकानेक नियतकालीक, ग्रंथ, पुस्तकं, चरित्रं आणि डिस्कवरी वा नॅशनल जिऑग्राफिकसारखे चॅनेल, यामधून आपल्याकडे पोचतात.
एडमंड हिलरीचं नाव आता अजरामर झालं आहे. पण त्याला प्रसारमाध्यमात स्थान कधीतरी मिळतं. या उलट भगीरथाची वा गंगेची गोष्ट अजूनही टिव्ही चॅनेलवर सुरु असते आणि पुढचे अनेक वर्ष राहील. गंगेलाच भागीरथी म्हणतात त्यामुळे भगीरथाचं नावही अजरामरच झालंय तेही इसवीसनाच्या पूर्वीपासून.
भगीरथाची गोष्ट बारकाईने वाचली आणि भूगोलावर ठेवली तर मात्र भगीरथाचा प्रवास मुखापासून सुरु झाल्याचं ध्यानात येईल. म्हणजे असं की भगीरथाच्या हजारो पितरांनी म्हणे समुद्रावर हल्ला केला आणि समुद्राने त्यांचा पराभव केला आणि या युद्धातच ते कामी आले, असं गोष्ट म्हणते. गंगा हजारो मुखांनी बंगालच्या उपसागराला मिळते या वास्तवाचं ते गोष्टीमध्ये झालेलं रुपांतर असावं (विश्वनाथ खैरे यावर अधिक प्रकाश टाकू शकतील).
गंगेवर धरणं बांधलेली नव्हती तेव्हा कोलकता-आग्रा-कोलकता हा प्रवास बोटीने केला जायचा. अर्थातच भगीरथ मुखापासून चालू लागल्यावर गंगेच्या खोर्यातील नदीचं विस्तीर्ण पात्राने त्याला मोहीत केलं असणार. म्हणूनच या नदीचा संबंध त्याने आकाशगंगेशी जोडलेला असणार. आता आकाशातली गंगा जमिनीवर अवतरायची असेल तर पृथ्वी आणि आकाश यांना जोडणारा दुवा त्यावेळी तरी हिमालयच होता. स्वर्गातून जमिनीवर यायची गंगेची तयारी नव्हतीच. ते ब्रह्मदेवाने ताडलं होतं म्हणून तर तो भगीरथाला म्हणाला, बाबारे गंगेने आकाशातून पृथ्वीवर उडी घेतली तर तिला झेलणार कोण आणि झेललं नाही तर पृथ्वीचा सर्वनाश होईल. मग ब्रह्मदेवानेच त्याला सुचवलं भोळासांब शंकर गंगेला झेलू शकतो. भगीरथाने म्हणे हजार वर्षांची तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केलं. गंगेला आपल्या जटेत झेलायला भोळासांब तयार झाला. हिमालयाची शिखरं पाह्यली तर ती जटाभारांसारखीच दिसतात. त्यावरून ही कल्पना सुचली असावी हे हिमालयात गेलेल्या कुणालाही समजू शकेल.
गंगेला शंकराची खोड मोडायची होती. म्हणून तीने सर्व शक्ती एकवटून उडी मारली. शंकराचा जटाभार कितीही मोठा असला तरी त्यालाही वेदना झाल्याचं. क्रोधित होऊन त्याने गंगेला जटाभारात पूर्ण आवळून टाकली. भगीरथाने त्याला आठवण करून दिली तेव्हा कुठे शंकराने एक बारकी धार आपल्या जटेत सोडली. गंगोत्री, गोमुख इथे गेलेल्यांना ठाऊक आहे की गंगेचा उगम हिमनदीतच आहे.
शंकराने सोडलेल्या गंगेच्या बारक्या प्रवाहाला घेऊनच भगीरथ निघाला. गंगा थोडीच निमूटपणे त्याच्यापाठून जाणार. ती रोरावत, पहाडांना टकरा देत, वळणं घेत, भगीरथाला चकवा देण्याचा पुरेपुर प्रयत्न करत धावत होती. ती क्रुद्ध होतीच. गंगेच्या रौद्र रुपामुळेच तिला भागीरथी म्हणतात. भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमावर गेलं तर ते सहज कळतं, असं संजीव माझा थोरला भाऊ म्हणाला. तो दरवर्षी हिमालयात काही दिवस हिंडत असतो.
गंगेला शांत करणं भगीरथाच्या आवाक्याबाहेर होतं. समोर जे येईल ते उध्द्वस्त करत ती चालली होती. डोंगर, शिळा, झाडं, जंगलं काहीही तिच्या कचाट्यातून सुटत नव्हतं. अनेकदा ती भगीरथाच्या पुढेच धावत असायची. भगीरथ बरंच चालून गेला पण त्याला मागे वा पुढे गंगा भेटेना. तेव्हा तो हैराण झाला. गंगेने जन्हू ऋषींचा आश्रमच गिळंकृत केला होता. त्यामुळे चिडलेल्या जन्हूंनी आख्खी गंगाच पिऊन टाकली होती म्हणे. भगीरथाने जन्हूंना साकडं घातलं. मग जन्हूंनी तिला कानातून बाहेर काढली. म्हणून तर तिला जान्हवी म्हणतात. हा प्रदेश बहुधा ऋषीकेश असावा. हेमंत कर्णिक (माझा हिमालयप्रेमी मित्र) म्हणतो ऋषीकेश ही पर्वतरांगांची सुरुवात आहे तर हरद्वार हा मैदानाचा शेवट. तपश्चर्या करणार्या ऋषींचं शरीर मातीत विलीन झालं केवळ केस उरले म्हणून त्या प्रदेशाला ऋषीकेश म्हणतात, असं पुराणं सांगतात. म्हणजे नदीच्या खोर्याची उकल जन्हू ऋषींच्या गोष्टीने केली.
त्यानंतर गंगेच्या मुखापर्यंत येताना प्रत्येक घाटावर गोष्टीच गोष्टी आहेत. पण भगीरथाचं ऐतिहासिक कार्य गंगेला जन्हू ऋषींच्या तावडीतून सोडवल्यावर संपलं. मग त्याने आपल्या पितरांचं तर्पण केलं. गंगेच्या मुखापासून भगीरथाची गोष्ट सुरु होते. नदीच्या प्रत्येक टप्प्याचं आकलन करून घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात. या गोष्टींची गंमत केवळ कल्पनाशक्ती वा अद्भुतरम्यतेत नाही, त्यांची मुळं वास्तवात आहेत आणि ते वास्तव म्हणजे केवळ भूगोल नाही तर, निसर्गातली घटितं--नदी, माणूस आणि चराचरसृष्टी यांचे वास्तवातले संबंध यांची उकल ही पुराणकथा करते. सर्वच कला या असत्य असतात पण त्या सत्याच्या सर्वाधिक जवळ असतात, या पिकासोच्या म्हणण्याची आठवण व्हावी अशी ही पुराणकथा आहे (हीच कशाला जवळपास सर्वच पुराणकथा अशाच आहेत).
एडमंड हिलरीच्या गंगाप्रवासाच्या बारीकसारीक नोंदी ग्रंथात, पुस्तकात आहेत. हिलरी वा त्याच्या साथीदारांनी काढलेले फोटो वा फिल्मही आहे. मात्र हिलरीच्या गंगा पर्यटनाने एकही गोष्ट सांगितली नाही. त्यांनी वास्तवाच्या नोंदी चोख ठेवल्या आहेत. परंतु तरिही त्याचं पर्यटन सत्याप्रत सोडाच तथ्यापर्यंतही पोचलं नाही. भगीरथाने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या त्यामुळे संपूर्ण भारतातल्या जनतेचं भावविश्व समृद्ध झालं. भाषा समृद्ध झाल्या. अनेक वाक्प्रचार, म्हणी या पुराणकथेमुळे रुढ झाल्या. माणसा-माणसातली नाती, माणूस-निसर्ग आणि अवघं विश्व यांच्यातली नाती अशा अनेक संबंधांवर पुराणकथांनी प्रकाश टाकला. आणि या गोष्टींमध्येच बेमालूनपणे निसर्गातील घटितांचा कार्यकारण भावही पकडला.
पुराणकथांच्या या अजब रसायनाला मॅजिकल रिअॅलिझम म्हणता येईल, अशी चर्चा युरोप-अमेरिकेतले आणि भारतातलेही साहित्य रसिक करू लागले आहेत. काफ्कापासून सुरु झालेला मॅजिकल रिअॅलिझमचा (वाचाः विलास सारंग यांचं सिसिफस आणि बेलाक्वा) युरोपियन साहित्यातला प्रवाह सरस्वती नदीसारखा लुप्त झाला त्यानंतर दक्षिण अमेरिकत प्रकट झाल्यावर भारतीय पुराणकथांचा अर्थ लावू लागला, असं म्हणावं लागेल. हे म्हणजे वास्को द गामाने भारताला जायचा मार्ग शोधला, कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, असं युरोप केंद्रीत बोलणं होईल.

Saturday, 2 January 2010
पूर्व दिशेला जाऊ लागलो की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बदलतात….
पूर्व दिशेला जाऊ लागलो की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बदलतात. मुंबईत संध्याकाळ सुरु होते ऑफिसातून बाहेर पडल्यावर म्हणजे सहा किंवा सात वाजता. रात्र सुरु होते दहा वाजता. गोहाटीत, शिलाँगला किंवा ईशान्य भारतात संध्याकाळ सुरु होते पाच वाजता. सिनेमा, नाटक, प्रदर्शनं यांची थोडीफार रेलचेल गोहाटीला. अतिरेकी संघटनांचा सुकाळ आणि स्थानिक, परदेशी, परप्रांतीय, आदिवासी, मैदानी असे अनेक तणाव. त्यामुळे संध्याकाळी रस्त्यावर पोलिस नव्हे तर केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक. वातावरणात एक अनिश्चितता रेंगाळू लागते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात धुकं. रस्त्यावरचे दिवेही मलूल भासू लागतात. स्वेटर, कोट, कानटोप्या, शाली यांनी झाकलेली माणसं रिक्षात, मोटारीत, रस्त्यावर दिसू लागतात. कोणाचाही भरवंसा वाटत नाही. लांबलचक संध्याकाळ दारूच्या प्याल्यात बुडवणं सोईचं असतं. बार ओस पडलेले असतात आणि वाइन शॉप बराच वेळ उघडी असतात. बहुतेक लोक घरी बसूनच पितात. दारूचा रोमान्स बिल्कुल नाही.
ईशान्येच्या जवळपास सर्वच राज्यात स्त्रिया तुलनेने निर्धास्त दिसतात. तिथे कोणी पडदा वा बुरखा वापरत नाही. अगदी मुसलमान स्त्रियाही. चहा-सिग्रेटच्या टप-या, रेस्त्रां, दारूसह अनेक छोटी-मोठी दुकानं स्त्रिया चालवतात. रेस्त्रांमध्ये वेटरचं काम करण्यापासून ते गल्ल्यावर बसण्यापर्यंत अनेक कामं त्या करतात. छेडछाडीच्या घटना अपवादाने घडतात. लैंगिक छळाच्या घटना वा गुन्हे यांचं ईशान्येतील राज्यांमधलं प्रमाण इतर देशाच्या तुलनेत खूपच कमी असावं.
ईशान्य भारतात बारक्या चणीचेच लोक दिसतात. धिप्पाड, मजबूत देहयष्टीचे लोक अपवादानेच आढळतात. आदिवासी असोत वा नेपाळी, भुटिया किंवा बंगाली वा आसामी सर्व बारक्या चणीचे. बाजारात, दुकानात, रेल्वे स्टेशनात, बस स्टँडवर किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी भांडण करणारे, हमरीतुमरीवर आलेले लोक अपवादानेच दिसतील. गुर्मी एकंदरीतच कमी आढळते. माणसाचं जीवन कम्युनिटीमध्ये बंदिस्त असतं कारण समूहातच सुरक्षा असते. अभिजीतच्या लग्नाला बहुसंख्य पाहुणे, नातेवाईक बंगालीच होते. त्यातही पूर्व बंगालातून स्थलांतरीत झालेले. लग्न चार-आठ दिवस चालतं याचं एक कारण बिरादरीची वीण घट्ट करणं हेही असावं. मुसलमान, हिंदू, अहोम, आसामी, बंगाली, तिवा, लालुंग, सुतिया, खाँसी, जैंतिया, गारो, नागा सर्वच लोक आपआपल्या बिरादरीत सुरक्षित असतात. समूहामुळेच ते नैसर्गिक संसाधनांवर वा आपल्या जिविकेवर नियंत्रण ठेऊ शकतात. किंबहुना हेच ईशान्य भारतातील बहुतेक सर्व वांशिक संघर्षांचं मूळ कारण आहे.
समूह जीवनात सुरक्षितता शोधायची आणि जगण्याच्या आकांक्षा व्यक्तीवादाच्या, हा ईशान्य भारतातला नवा तणाव आहे. व्यक्तीकेंद्री जगण्याच्या चौकटीला समूहाचा भक्कम आधार असतो परंतु हा समूह अस्मिता नसलेला बिनचेहे-याचा असतो. त्याचं नियंत्रण राज्य घटना, लिखित कायदे-कानून आणि त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यांच्यामार्फत होतं. भाषा, धर्म, जात, जमात, वंश हे या समूहाचे आधार नसतात. अर्थात या तणावातूनच ईशान्य भारतातली संस्कृती नवी वळणं घेऊ लागली आहे.
१९८३ साली मी पहिल्यांदा आसामला गेलो त्यावेळी आसामी लोक ‘चहा’ला ‘सा’ म्हणत असत. आसामी भाषेत ‘च’ नव्हता. त्यांचा चहा बहुधा बिन दुधाचा असायचा. नागालँण्डमध्ये फिकाचाय प्यायचे. म्हणजे बिन दुधाचा, बिन साखरेचा चहा. आता सर्वत्र चहा मिळतो, म्हणजे दुध आणि साखर घातलेला. ‘चहा’ हा शब्दही आसामी भाषेने आपलासा केला आहे. त्याच्यासोबत ‘च’ ही आसामी झालाय. १९८३ साली ईशान्येतल्या पहाडी वा आदिवासी राज्यांमध्ये बियांची केळी मिळायची. सिताफळ खातो तशी बिया थुंकत ती खायला लागायची. २००५ साली नागालँडच्या दुर्गम भागातही मला बिनबियांचीच केळी मिळाली. बियांची केळी पार जंगलातच असतात ती विकायला येत नाहीत असं एका नागा बाईने सांगितलं. पहाडी राज्यात केळी सोडली तर कोणतंही स्थानिक फळं गोड नव्हतं. खाण्यायोग्य सर्व फळं आंबट, तुरट वा कडवट होती. आता सर्व राज्यांमध्ये अननस, पपया, संत्री, पेरू यांची लागवड केली जाते. अरुणाचल प्रदेशात तर सफरचंदाचंही उत्पादन घेतात.
बँण्डस्ची संस्कृती आता ईशान्येत हळूहळू रुजू लागली आहे. विशेषतः पहाडी राज्यांमध्ये. तिथल्या तरूणांची नाळ हिंदी, बंगाली वा आसामी गाण्यांपेक्षा पाश्चात्य संगीताशी चटकन् जुळते. त्यांचे बँण्डस् आहेत, त्यांच्या स्पर्धाही होत असतात. शिलाँग, चेरापुंजी हिंडण्यासाठी आम्ही गाडी ठरवली होती. ड्रायव्हरने फ्लॅश ड्राईव्हवरची गाणी वाजवायला सुरुवात केली. त्यामध्ये पारंपारिक आसामी संगीत, बंगाली संगीत, हिंदी चित्रपटांमधली गाणी आणि सर्वाधिक पाश्चिमात्य अर्थात इंग्लिश गाणी होती. संध्याकाळी शिलाँगला परतलो. अभिजीतच्या घरी गेलो. लग्नघर सजलं होतं. रोषणाई वगैरे. नातेवाईक, मित्र आले. कोणीतरी हार्मोनियम काढलं. आणि मानोषने रविंद्र संगीत म्हणायला सुरुवात केली. सिल्चरहून आलेले नातेवाईक लहान-थोर सर्वच, रविंद्र संगीत ताला-सुरात म्हणू लागले. त्यावर पारंपारिक नृत्यही सुरु झालं. थोड्या वेळाने अंगणात दिवे वगैरे लावून वेस्टर्न पॉप म्युझिक वाजू लागलं. काही क्षणांपूर्वी रविंद्र संगीतात दंग झालेली तरुण पिढी पॉप म्युझिकच्या तालावर थिरकू लागली आणि बुजुर्ग टाळ्या वाजवत त्यांचे हौसले बुलंद करत होते.

उत्पल बोर्दोलोई
दोल म्हणजे देऊळ, दोलोई म्हणजे देवळात काम करणारा. अर्थात तो पुजारी नसतो. झाडलोट करणारा, पुजेची तयारी करणारा कोणीही. बोर्दोलोई तेच. म्हणजे सेकंड क्लास ब्राह्मण, इति उत्पल बोर्दोलोई. त्याची खापर पणजी बालविधवा होती. जीवनाला कंटाळून तिने नदीत उडी मारली. काही ब्रिटीश सैनिकांनी तिला वाचवलं आणि मिशन-यांच्याकडे सोपवलं. यथावकाश तिचा बाप्तिस्मा झाला, पुढे विवाहही झाला. ही गोष्ट कळल्यावर उत्पलला ईशान्य भारतातील ख्रिश्चनांच्या सामाजिक इतिहासात रस वाटू लागला. याच विषयावर काम करायचं त्याने ठरवलं. पण हे काम तो तडीस नेईलच याची मला खात्री वाटत नाही.
उत्पलची आणि माझी भेट बहुधा १९९८ साली झाली. आम्ही दोघंही डेक्कन हेराल्ड या बंगलोरच्या वर्तमानपत्रात वार्ताहर होतो. मी मुंबईला तर तो गोहाटीला. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्यं माझ्याकडे होती तर संपूर्ण ईशान्य भारत उत्पलकडे सोपवलेला होता. उत्पलला पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले होते. स्टेट्समन दैनिकाचा ग्रामीण वार्तांकनाचा पुरस्कार त्याला सलग दोन वर्षं मिळाला. त्यानंतर मानवी हक्क विषयक पुरस्कारही मिळाला. उत्पलचा जनसंपर्क दांडगा होता पण तो स्वभावाने कलहप्रिय होता. पत्रकारितेबाबतचे त्याचे उसूल पक्के होते. गोहाटीच्या राजभवनात पत्रकार परिषद होती. ईशान्य भारतातल्या एखा पत्रकाराचा दबदबा खूप होता. उत्पलला माहीती मिळाली होती की त्या पत्रकाराने राज्य सरकारकडून दारू विक्रीच्या दुकानाचा परवाना मिळवलाय. उत्पलने त्या आदेशाची प्रत मिळवली आणि त्याच्या प्रती पत्रकार परिषदेच्यावेळी सर्व वार्ताहरांना वाटल्या.
उत्पल दणकून दारू प्यायचा. बरळायचा. भांडणतंटा करायचा. त्याच्यासोबत सलगपणे चार-दोन तास काढणं कोणत्याही सहका-या अवघड जायचं. डेक्कन हेराल्डमध्ये असताना आमची भेट फक्त एकदा झाली. बंगलोरमध्ये. वार्ताहरांच्या मिटिंगला. आम्ही दोघे एकाच हॉटेलात उतरलो होतो. मध्यरात्रीच्या सुमारासही तो टिव्ही लावून बडबड करत होता असं त्याच्या रुम पार्टनरने सांगितलं. मिटिंगमध्येही तो दारूचे घुटके घेत असायचा. त्याच्या कोटाच्या खिशात चांदीची फ्लास्क असायची. त्या चपटीमध्ये कमी दारू यायची म्हणून तो पाणी न घालता कच्ची दारूच प्यायचा. आम्हाला सांगायचा की सर्दी झालीय म्हणून तो रमचे घुटके घेतोय, “ इटस् मेडिसिन.”
दुपारी त्याला मी सिग्रेटमध्ये तंबाखू घालताना बघितलं. तर म्हणाला त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे म्हणून तो थोडा गांजा पित होता. आणि पोट बिघडलं तर या माझ्या प्रश्नावर तो गंभीरपणे म्हणाला, चार तांदळाच्या दाण्याएवढी अफू रोज खाल्ली तर पोटाला उत्तम. मी म्हटलं, तू एक दवाखानाच टाक. रम, गांजा, अफू ही औषधं घेण्यासाठी रांग लागेल तुझ्या दवाखान्यापुढे. यथावकाश चरस, भांग, ताडी-माडी यांचेही औषधी गुण कळतीलच तुला.
२००० साली मी डेक्कन हेराल्ड सोडला. उत्पलची बंगलोरला बदली झाली. त्यानंतर उत्पलची गाठभेट होण्याची संधीच आली नाही. २००५ साली गोहाटीला गेलो तेव्हा उत्पलचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. डेक्कन हेराल्डमध्ये फोन केला. त्याने नोकरी सोडल्याचं कळलं. त्याच्या घरचा फोन नंबर वा पत्ताही संपादकीय विभागात मिळाला नाही. गोहाटीतल्या पत्रकारांना त्याचं नाव माहीत होतं, अनेकजण त्याचे मित्र वा सहकारी होते पण कोणाकडेही त्याचा फोन नंबर मिळाला नाही. तो कुठे राहतो हेही फारच कमी पत्रकारांना ठाऊक होतं. कुणीही त्याला भेटायला उत्सुक नव्हतं. अनेकांना तो जिवंत आहे का याबाबतही शंका होती.
या खेपेलाही असंच झालं. कोणाकडेच त्याचा पत्ता वा फोन नंबर मिळेना. शिलाँगला मानोष दास या टाईम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराची ओळख झाली. उत्पलचा ठावठिकाणा बी. बी. लोहकर सांगू शकेल असं तो म्हणाला. त्याने लोहकरला फोन केला. गोहाटीला बेदब्रत लोहकरची भेट झाली. त्याने चार-दोन फोन नंबर दिले परंतु त्यापैकी एकही उत्पलचा वा त्याच्या कुटुंबियांचा नव्हता. एका संध्याकाळी बेदब्रत म्हणाला आपण त्याच्या घरीच जाऊया. उत्पलचं घर, खारघुली टेकडीवर होतं. तिथे ब-यापैकी झांडंझुडुपं होती. कधी कधी तिथे कोल्हे, सापही निघतात, असं बेदब्रत म्हणाला. तोही ब-याच वर्षांनी उत्पलच्या घरी जात होता. अंधार झाला होता. पत्ता विचारत आमची गाडी कच्च्या रस्त्याने सरकत एका गेटपाशी थांबली. हेच उत्पलचं घर, बेदब्रत म्हणाला.
अंधार होता. तीन कुत्री आम्हा दोघांवर चाल करून आली. गेट बंद होतं म्हणून आम्ही निर्धास्त होतो. आवारापलिकडे दुमजली घर होतं. दरवाजा उघडला. लेंगा, शर्ट, स्वेटर, मफलर आणि कानटोपी चढवलेला एक माणूस बाहेर आला. तो प्रकाशात आणि आम्ही अंधारात होतो. उत्पल बोर्दोलोई आहेत का, असं आम्ही आरोळ्या देत विचारलं. बेदब्रत म्हणाला, ते उत्पलचे वडिल असावेत. तो माणूस परत आत गेला. काही क्षणात बाहेर आला. एका कुत्र्याला बांधलं. दुसरी कुत्री भुंकायची बंद झाली. मग आम्ही गेट उघडलं. घराकडे गेलो. कुत्र्यांना आवरणारा माणूसच उत्पल होता.
त्याने मला आणि बेदब्रतला ओळखलं. तात्काळ तो मिडियाबद्दल बोलू लागला, डॉ फ्रँकन्स्टाईनची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. काही वर्षांपूर्वी त्याने डुकराचं हृदय माणसाला बसवल्याचा दावा केला होता आता तो माणसाचं मुंडकं डुकराला लावतोय, असा ओचकारे काढणारा विनोद त्याने केला. त्यावेळी गोहाटीच्या वर्तमानपत्रात या डॉक्टरचं प्रकरण गाजत होतं. त्याच्या हॉस्पीटलच्या आवारात आणि इमारतीत बेपत्ता झालेल्या दोन इसमांची मुंडकी सापडली त्यामुळे गावक-यांनी हॉस्पीटलला आग लावल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. बेदब्रत ज्या वर्तमानपत्रात काम करत होता, त्यामध्ये मात्र हॉस्पीटलच्या इमारतीत मुंडकी सापडल्याच्या वृत्ताला पुष्टी दिलेली नव्हती. उत्पलचा रोख अर्थातच बेदब्रतवर होता.
बंगलोरला बदली झाल्यावर उत्पलचे वडील वारले. गोहाटी-शिलाँग मार्गावर जोराबाटच्या जवळ त्यांची शेती होती. गोहाटी शहराचा विस्तार आता त्याच परिसरात होऊ लागलाय. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी उत्पलला गोहाटीला परतणं भाग होतं. तोवर मिडिया बाजारपेठलक्ष्यी झाला होता. स्थानिक वर्तमानपत्रांचं अर्थशास्त्र बदलून गेलं होतं. उत्पल हा एकांडा शिलेदार होता. स्थानिक वर्तमानपत्राचा वा गोहाटी आवृत्तीचा संपादक म्हणून काम करायचं तर एकांडी शिलेदारी कामाला येत नाही. टीमला हाकावं लागतं. अर्थातच वर्तमानपत्रासाठी तो अनएम्लॉएबल ठरला. त्याने काही काळ लेख वगैरे लिहिले पण त्यात तो रमला नाही. स्थानिक वर्तमानपत्र पुरेसं मानधन देत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. परिणामी तो मिडीयाच्या रडारवरूनच लुप्त झाला. त्याने ट्रान्सपोर्टचा धंदा सुरु केला. त्यातल्या करप्शनने वैतागला. तो धंदा बंद केला. वारसाहक्काने मिळालेली प्रॉपर्टी डेव्हलप करायच्या मागे तो लागलाय पण त्यातही तो हैराण झालाय. कोणी लाच मागितली की त्याला भयंकर चीड येते. त्याच्यातला पत्रकार जागा होतो. माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून अनेकांना वठणीवर आणायचा उपद्व्याप त्याने सुरु केला. त्यामध्ये त्याला ब-यापैकी यशही मिळालं.
ईशान्य भारतातल्या ख्रिश्चनांचा सामाजिक इतिहास लिहिण्याचा प्रकल्प तो पूर्ण करेल का, असं मला बेदब्रतने विचारलं. ती फक्त त्याला सुचलेली कल्पना आहे. या प्रोजेक्टला फंडिंग मिळाल्याशिवाय तो काम सुरु करणार नाही. आणि फंडिंग मिळालं तरिही तो कोणत्या ना कोणत्या तक्रारी करत काम पुढे ढकलत राहील. कारण त्याला आतून तसं वाटत नाहीये. तो बहुधा चर्चच्या कामात अधिक गुंतलाय म्हणून त्याला सध्या ह्या कामात रस वाटत असावा. चर्चच्या कामामुळेच त्याची दारू सुटली असावी किंवा दारू सोडण्यासाठी त्याने चर्चच्या कामात स्वतःला गुंतवलं असावं.
बेदब्रत म्हणाला, पण त्याच्यात फारसा बदल झालेला नाही. मी म्हटलं खरं आहे, अजून निखारे धगधगतायत पण त्याने लेखणी चालवली नाही तर लवकरच त्यांची राख व्हायला लागेल.

Subscribe to:
Posts (Atom)