जपानी बाग
चर्नीरोड ते मरीनलाईन्स ह्या रस्त्यावर कोणे एकेकाळी गोरे साहेब आणि त्यांच्या मड्डमा संध्याकाळी फिरायला यायच्या. समुद्र तिथपर्यंत होता.सोनापूरात हिंदू स्मशानभूमी होती. पुढे तिचं नाव झालं चंदनवाडी. संध्याकाळी फिरायला जायचं आणि पेटलेल्या चिता वा अंत्यसंस्कार बघायचे ह्याची किळस आली गोर्यांना. त्यांनी बूट काढला की ही स्मशानभूमीच हलवावी इथून. त्यावेळी नाना शंकरशेटांनी दगडी भिंत बांधून दिली स्वतःच्या खर्चाने आणि तो प्रश्न निकालात काढला.
हिंदू दहनभूमीला लागून पुढे मुसलमानांचं कबरस्थान होतं. त्याच्यापुढे सीरियन्/आर्मेनिअन्/जॉर्जिअन अशा कुठल्यातरी लोकांसाठी राखून ठेवलेली दफन भूमी होती. दुसर्या महायुद्धाच्या काळात काही सैनिकांचे/लोकांचे दफन इथे झाले होते म्हणतात. या लोकांचे मुंबईत अस्तित्व न उरल्यामुळे या दफनभूमीचा उपयोग उरला नाही. ही विनावापर पडून असलेली जागा मुंबई महापालिकेकडून मिळवून तिथे बाग करायचा बूट निघाला. तो गिरगावकरांनी उचलून धरला. त्यातल्या कायदेशीर अडचणी वगैरे म्हणे स. का. पाटलांनी मार्गी लावल्या. आणि तिथे जपानी बाग उभी राह्यली.
त्या बागेमध्ये केवळ झोपाळे, सीसॉ नव्हते तर खेळण्यासाठी इतरही अनेक गंमती होत्या. लंडनच्या टेम्स नदीवरील पुलाची प्रतिकृती, त्यातल्या लोखंडी दांड्याना लटकत वा त्यावरून चालत जाणं, मनोर्यावर चढत जाऊन गुळगुळीत पाइपावरून घसरत खाली येणं. अवघ्या मुंबईत अशी बाग नव्हती साठच्या दशकात.
तिथे एक तळंही होतं. त्यात मासे होते. ते गप्पी मासे पकडायला आम्ही तिथे प्लॅस्टिकच्या पिशव्या धागा लावून टाकायचो. वेगवेगळ्या पातळीवरच्या मोकळ्या जागा. दगडांच्या छोट्यामोठ्या भिंती, हिरवळ, बगीचे. एक अॅम्फी थिएटरही होतं. तिथे सिनेमे दाखवले जायचे. हिरवळीवर बसून, दाणे खात सिनेमा पाह्यचा. तिथे बाबा आमटेंचं भाषण झाल्याचंही मला आठवतं.
त्या थिएटरच्या खाली बायकांनी चालवलेलं रेस्टॉरंट होतं. मला वाटतं ही कल्पना प्रमोद नवलकरांची. ते जपानी बागेच्या बाजूलाच राह्यचे. जपानी बागेत गोट्या वा बैदूल वा कंचे खेळण्याची सोय नव्हती. मी दुसरीत वगैरे असेन, नवलकरांची ओळख झाली तेव्हा मी त्यांच्याकडे ही तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले गोट्या खेळायला आमच्या वाडीत ये. त्यांनी घरी नेऊन वीस-पंचवीस गोट्या दिल्याचंही आठवतं.
हे उद्यान गिरगावकरांचं लाडकं उद्यान होतं. समोरच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. तिथे अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. पण प्रवेश मर्यादीत विद्यार्थ्यांनाच मिळायचा. मग गिरगावातली मुलं जपानी बागेत अभ्यास करत बसायची. जपानी बागेतला काही भाग अभ्यासिकाच बनून गेला होता. मुली बालभवनाच्या उद्यानात अभ्यास करायच्या. चर्नीरोड स्टेशनच्या अलीकडे आणि पलीकडे दोन अभ्यासिका होत्या ज्यामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश होता.
बर्याच दिवसांनी आज जपानी बागेच्या बाजूने बसने गेलो. तिथे आता बाग नाही. पण स. का. पाटील ह्यांचा पुतळा आहे म्हणून स. का. पाटील उद्यानाची पाटी आहे. बागेत जलशुद्धीकरण का सांडपाण्याचा प्रोजेक्ट आहे. एकेकाळच्या वैभवशाली बागेचे काही अवशेष दिसतात.
उद्या कदाचित जपानी बागेवर आणखी कोणतंतरी बांधकाम उभं राहील.

हजार वर्षांनी तिथे उत्खनन केलं तर जलशुद्धीकरण वा सांडपाण्याचा प्रकल्प, त्याखाली बाग, त्याखाली कबरस्थान, त्याच्याही खाली कोळ्यांचं खळं असे सिव्हीलायझेशनचे थर सापडतील.
एकंदरीत इथले लोक खूप प्रगत नागरी जीवन जगत होते असा निष्कर्ष निघेल.

जिमखाने
चर्नीरोड स्टेशन ते मरिन लाईन्स या रेल्वेलाईनच्या एका बाजूला गिरगाव तर दुसर्या बाजूला मरिन ड्राईव्ह.
गिरगाव हे गावच होतं. शंभर-दोनशे वर्षांपूर्वी.
रेल्वेलाईन टाकताना समुद्र हटवला.

मुंबई हायकोर्ट नुक्तच स्थापन झालं होतं. त्या कोर्टात पहिली जनहित याचिका दाखल केली परेड ग्राउंडवर (आझाद मैदान) क्रिकेट खेळणार्या तरुणांनी. मुंंबईत त्यावेळी ते एकच मैदान होतं. बॉम्बे जिमखाना हा गोर्या अंमलदारांचा. तो त्यावेळीही कुंपणात होता. उरलेल्या मैदानात ही पोरं क्रिकेट खेळायची. पण गोरे सोजीर घोड्यावरून पोलो खेळायला आले की त्यांना हाकलून लावायचे.
नेटिवांना खेळण्याचा हक्क आहे, ह्या मुद्द्यावर या तरुणांनी पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन दाखल केलं. कोर्टात सुनावणी सुरू झाली, तारखा पडत होत्या. त्यावेळचा मुंबईचा गोरा अंमलदार क्रिकेटप्रेमी होता. मरिन लाइन्स आणि चर्नीरोडच्या दरम्यानचा समुद्र हटवून तिथे नेटिवांसाठी क्रिकेटची मैदानं केली. पारसी, इस्लाम, हिंदू, कॅथलिक असे जिमखाने झाले. एक विल्सन कॉलेजला दिला, दुसरा मेडिकल कॉलेजला.
ह्या मैदानावर गिरगावातली हजारो मुलं वर्षानुवर्षे मुक्तपणे खेळत होती. मला वाटतं नव्वदच्या दशकात पोलीस जिमखाना उभा राह्यला. आयपीएस अधिकार्यांसाठी. म्हणजे त्यांच्या पार्ट्या, गेटटुगेदर आणि चैनींसाठी. त्यांनी मैदानाचा असा बंदोबस्त केला की केवळ पैसेवालेच तिथे खेळू शकतील. तीच गत इतर मैदानांचीही झाली. आता ही मैदानं क्रिकेटपेक्षा लग्न समारंभासाठीच वापरली जातात. अपवाद विल्सन कॉलेजच्या जिमखान्याचा.
खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, संस्था चालक, वाड्या-गल्लीतले पुढारी, गणेशोत्सव मंडळं, मतदार कुणालाही नेटिवांच्या खेळण्याच्या हक्कांची काहीही पडलेली नाही.
अजय आणि विजय
गिरगाव चौपाटीचे दोन भाग होते. छोटी चौपाटी आणि मोठी चौपाटी.
मफतलाल बाथ म्हणजे स्विमिंग पूलच्या अलीकडे छोटी चौपाटी आणि पलीकडे मोठी चौपाटी.
पोहायला शिकणारे छोट्या चौपाटीवर जायचे. तिथे हवा भरलेल्या ट्यूब भाड्याने मिळायच्या. एका तासाचे चाळीस पैसे असा दर होता.
बंडूमामा आम्हा तीन भाच्यांना (मी, संजीव आणि मंदार) तिथे पोहायला शिकवायचा.
एक ट्यूब भाड्याने घ्यायची. म्हणजे एक जण पाण्यात तरंगत असायचा. दुसरा डुंबत असायचा तेव्हा तिसर्याचं प्रशिक्षण सुरू असायचं.
आकाशाकडे तोंड करून पाण्यावर उताणा पाडायचा.
पाठीखाली हात धरायचा.
अंग हलकं सोड, श्वास पोटाने घे, हातपाय एकदम हलके कर
अशा सूचना.
कमरेखाली मामाचा हात नाही तर केवळ एक बोट आहे हे आम्हाला कळायचं.
अंग हलकं सोड, मुठी वळू नकोस, हात आणि पाय फाकव.
आम्ही आटोकाट प्रयत्न करायचो त्या सूचना पाळण्याचा.
मग कमरेखालचं बोटही दूर व्हायचं.
डोळ्यावर पाणी यायचं. केवळ नाक पाण्याच्या वर राह्यचं.
कानही पाण्याखाली जायचे. मामाचं बोलणं ऐकू यायचं नाही.
खार्या पाण्याने डोळे चुरचुरायचे. तरिही डोळे उघडे ठेवून आम्ही आकाशाकडे पाह्यचो.
मामाचा चेहेरा बारका दिसायचा. मध्येच मोठा व्हायचा.
हळू हळू सदेह पाण्याखाली जायचो. नाकातोंडात खारं पाणी.
जीव घाबरा व्हायचा. आपण बुडणार ह्याची खात्री व्हायची.
मरो ते आडवं पडून राहणं. मामाच्या गळ्याला मिठी मारायची धडपड करायचो.
अशी धडपड केली की तो उचलून फेकून द्यायचा आणखी खोल पाण्यात.

मादरचोद, बुडवतोय साला, अशी शिवी दिली की पुन्हा एकदा फेकून द्यायचा.
समुद्रतळाला जायचो. निळं आकाश, निळं पाणी. आणि पांढरे बुडबडे. घाबरा झालेला जीव. त्या दोन भावांचा हेवा वाटायचा. एक मस्त तरंगतोय तर दुसरा डुंबतोय. माझ्याच वाट्याला बुडणं आलंय. हरामखोर लेकाचा.
ट्यूब आहे, होडी आहे, पोहायला येण्याची गरजच काय असं वाटायचं.
तोपर्यंत पुरती दमछाक झालेली असायची. फ्लोटिंगची अशी दोन-तीन सेशन्स पार पडली की मग सुटका व्हायची.
आता दुसरा भाऊ मामाच्या तावडीत यायचा. मला हसत होतास काय....भोग तुझ्या कर्माची फळं असं म्हणून उरलेले दोघे खूष व्हायचे.

काही दिवसांतच आम्ही तिघेही नीट तरंगू लागलो. मग हात-पाय मारत पुढे-मागे जाण्याचं ट्रेनिंग. कॉलेजमध्ये जाऊ लागेपर्यंत गिरगाव चौपाटीवर खूप आतमध्ये पोहत जाऊ लागलो. मी आणि अजय ठाकूरदेसाई, मफतलाल बाथमध्ये कपडे उतरवून, खुल्या समुद्रात पोहायला जायचो. गिरगाव चौपाटीपासून राजभवन पर्यंत. येता-जाताना दम खायला थांबायचो एका प्लॅटफॉर्मवर. अमर-अकबर-अँथनी या पिच्चरमधल्या एका गाण्यात आहे तो प्लॅटफॉर्म. राजभवनाच्या बीचजवळ पोचलो की तिथला वॉचमन बंदूक दाखवायचा. गांड फाटायची. हरामखोर साला, दम घ्यायलाही फुरसत देत नाही. शिव्या घालायचो त्याला आणि मागे वळायचो.
काल समुद्राजवळून गेलो. विजयचीही आठवण झाली. पावसाळा सुरु झाला की समुद्र खवळायचा. उंच लाटा धडकायच्या भिंतीवर. मरिन ड्राईव्हचा रस्ता ओला व्हायचा पाऊस नसताना. केव्हाही ढग भरून यायचे, पाऊस आणि लाटांचं तांडव सुरू व्हायचं. अशा वेळी संध्याकाळी मी आणि विजय वाडेकर त्या धक्क्यावरून धावायची रेस लावायचो. इयत्ता ८ वा ९ वी मध्ये होतो तेव्हा. अतिशय डेंजरस गेम होता तो. विजय नेहमी जिंकायचा.
अजयचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्याही आधी विजयचं. काल मरिन ड्राईव्हवरून जाताना दोघांची आठवण आली.
रात्रपाळीच्या गंमती
" माल आ चुका हैं, पुलिस का बंदोबस्त हैं
पीटर का फोन आयेगा, उसको कोडवर्ड बता देना-- आसमान में तारे हैं, आप हमारे हैं."
रात्री दोन वाजता कुणालाही फोन करून हे सांगायचं. ऐकणार्याची फाटायची.

पाच मिनिटांनी पुन्हा फोन करायचा त्याच नंबरवर--पीटर बोल रहा हूँ
तो माणूस ताबडतोब कोडवर्ड सांगायचा-- आसमान में तारे हैं, आप हमारे हैं
smile emoticon smile emoticon smile emoticon
त्यावेळी कॉलर आयडी वगैरे भानगडी नव्हत्या. कुठून फोन आलाय कळायचा नाही. टॉक टाईम वगैरे भानगडी नव्हत्या.

डिकेक्टरी चाळायची आणि कोणत्याही शहाला रात्री दोन वाजता फोन करायचा.
आप नॉनव्हेज खाते हैं क्या....
पुढंचं वाक्य-- सायन हॉस्पीटलमें एक अॅक्सीडेंट का केस हैं. ब्लड की जरूरत हैं आपका फोन नंबर मिला.
ऐकणार्याची फाटायची.
मेरा ब्लड ग्रुप मालूम नही. मगर कभी कभी नॉनव्हेज खाता हूँ. घरवालोंको मत बताना.....
smile emoticon smile emoticon smile emoticon
आप नॉनव्हेज खाते हैं क्या....
पुढंचं वाक्य-- सायन हॉस्पीटलमें एक अॅक्सीडेंट का केस हैं. ब्लड की जरूरत हैं आपका फोन नंबर मिला.
ऐकणार्याची फाटायची.
मेरा ब्लड ग्रुप मालूम नही. मगर कभी कभी नॉनव्हेज खाता हूँ. घरवालोंको मत बताना.....
smile emoticon smile emoticon smile emoticon
रात्री दोन वाजता फोन करायचा.
आपके खिडकीसें दर्या दिखता हैं....सायन हॉस्पीटलमें एक अॅक्सीडेंट केस है...
ऐकणार्याची फाटायची.
एक मिनिट, देखके बताता हूँ...असं म्हणायचा
नही दर्या नही दिखता हैं....
तो सो जाओ हमारा टाइम खराब मत करो.

smile emoticon smile emoticon smile emoticon smile emoticon
अजित जोशी, जतीन देसाई, मृत्युंजय बोस बर्याच महिन्यांंनी प्रेस क्लबमध्ये भेटले. जुन्या आठवणींना उजाळा दिला अजितने.
मझा आला...

६ जून २०१५ रोजी मुंबईला एक दिवस मुंबईत होतो. शास्त्रीहॉल-प्रेस क्लब-शास्त्रीहॉल असा हिंडलो. बालपणीच्या, तरुणपणीच्या, माझ्या जन्मापूर्वीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्याचा हा वानवळा